कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक
कृषी विभागाच्या पीक स्पर्धेत ॲड. शांतीलाल तरंगे तृतीय

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेला खरीप पिक स्पर्धेत तरंगफळ येथील ज्येष्ठ वितिज्ञ व प्रगतशील बागायतदार ॲड. शांतीलाल उत्तमराव तरंगे यांचा मका पीक स्पर्धेत माळशिरस तालुक्यात तृतीय क्रमांक आला असून त्यांचे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
ॲड. तरंगे यांनी पायोनियर या मका वानाची निवड केली होती. शेणखत घरचे असल्यामुळे मुबलक प्रमाणात वापरून रासायनिक खताचा योग्य वापर करून मका पीक घेतले होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



