कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका दौरा जाहीर…

माळशिरस (बारामती झटका)
ना. श्री. दत्तात्रय भरणे, मंत्री कृषी, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री वाशिम जिल्हा यांचा दि. 25/12/2025 रोजीचा पुणे, इंदापूर, माळशिरस, इंदापूर दौरा जाहीर करण्यात आला आहे.
नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
गुरुवार, दि. 25 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 09.00 वा. अवंती रेसिडेन्सी (एबीआयएल), टिळक रोड, पुणे येथुन निमगांव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे कडे मोटारीने प्रयाण, सकाळी 11.00 वा. निमगांव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे आगमन व जैन सांस्कृतिक हॉल इमारत बांधकाम समारंभास उपस्थिती स्थळ : जैन मंदिर मागे, निमगांव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे. (निमंत्रक – श्री. संतोषकुमार व्होरा व श्री. अभयकुमार गांधी), सकाळी 11.30 ते 04.00 वा. इंदापूर तालुका मतदार संघ परिसरात विविध ठिकाणी भेटी / कार्यक्रमास उपस्थिती, सायं. 04.00 वा. इंदापूर, जि.पुणे येथुन माळशिरस, जि. सोलापूर कडे प्रयाण, सायं. 05.00 वा. माळशिरस, जि. सोलापूर येथे आगमन व हॉटेल नंदनवन उदघाटन समारंभास उपस्थिती, स्थळ – 61 फाटा, अकलुज- माळशिरस रोड, अक्षता मंगल कार्यालय शेजारी, माळशिरस, सोलापूर, संपर्क – श्री. तुकाराम (भाऊ) देशमुख, सायं. 06.00 वा. अकलुज फेस्टीव्हल व कृषी प्रदर्शन उदघाटन समारंभास उपस्थिती स्थळ – धनश्रीनगर, इंदापूर रोड, अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, संपर्क – श्री. सतीश नाना पालकर, सायं. 06.30 वा. अकलुज, जि. सोलापूर येथुन भरणेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे कडे प्रयाण, सायं. 07.30 वा. निवासस्थान भरणेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे आगमन व मुक्काम असा असणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



