ताज्या बातम्यासामाजिक

कुरबावी येथील सौ.लतिका मारूतराव रुपनवर पाटील यांचे वार्धक्याने दुःखद निधन…

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. मारूतराव शंकरराव रुपनवर पाटील यांना पत्नी वियोग….

कुरबावी (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री. मारूतराव शंकरराव रुपनवर पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. लतिका मारूतराव रुपनवर पाटील यांचे शुक्रवार दि. 27/03/2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास वार्धक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा उच्चशिक्षित परिवार आहे. त्यांच्यावर कुरबावी येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळेस राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

स्व. काकींचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम रविवार दि. 29/03/2026 रोजी सकाळी 7.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमी कुरबावी येथे होणार आहे.

स्वर्गीय सौ. लतिका रुपनवर पाटील यांना काकी या टोपण नावाने ओळखत होते. त्यांचे माहेर वावरहिरे येथील पांढरे परिवारातील होते. त्यांच्यावर आई-वडिलांचे चांगले संस्कार होते. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. सर्व जाती धर्मातील सर्वांशी मिळून मिसळून वागत असत. त्यांचे आपल्या मुलांवर, नातवांवर अफाट प्रेम व चांगले संस्कार दिलेले आहेत. ज्येष्ठ नेते मारूतराव रुपनवर पाटील यांच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये सावलीप्रमाणे पाठीशी ठामपणे उभा राहत असत. गावातील व तालुक्यातील कामानिमित्त आलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करून पाहुणचार आदरादित्य करीत होत्या. त्यामुळेच त्यांना शुक्रवारी सौभाग्य मरण आलेले आहे. काकींच्या आत्म्यास शांती लाभो व रुपनवर पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button