तरंगफळ ग्रामस्थांनी केला नूतन अधिकाऱ्यांचा सन्मान

माळशिरस (बारामती झटका)
स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रम करीत हलाखीच्या परिस्थितीतून वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या चार जणांचा सत्कार रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग संघटना व ग्रामपंचायत तरंगफळ यांच्या संयुक्त विद्यमाने संग्राम महादेव गोडसे, आदिवासी विकाम विभागामधे नंदुरबार येथे गृहपाल ॲड. संदिप अंकुश लोरणे, सोमनाथ नरळे, देवकाते व अहिल्या नरूटे आदींचा सन्मान करण्यात आला.
खडतर परिस्थितीवर मात करीत ग्रामीण भागातून शिक्षण घेत बाजी मारलेल्या नव अधिकाऱ्यांचा सन्मान पार पडला. यावेळी मनोगतात नवीन अधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या यशाचे गमक सांगत परिस्थितीवर मात कशी करायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच नारायण तरंगे, माजी सरपंच भगवान तरंगे, रावसाहेब तरंगे, ग्रामपंचायत सदस्य जगुबाई जानकर, शशिकांत साळवे आदींसह मान्यवर उपस्थित होते.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



