कुसमोड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शहाजी लेंगरे यांची बिनविरोध निवड

पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील कुसमोड ग्रामपंचायतीच्या रिक्त असणाऱ्या सरपंच पदाच्या निवडीसाठी आज निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच पदासाठी शहाजी दत्तु लेंगरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे सरपंच पदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुषार लवटे, स्वाती मदने, बाळासो धायगुडे, राणी पवार, शारदा धायगुडे, उमा कचरे, रेखा पालखे आदी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन मंडलाधिकारी संदीप चव्हाण यांनी काम पाहीले तर सहाय्यक म्हणून ग्रामसेवक नवले यांनी काम पाहीले.
या निवडीवेळी हनुमंत धायगुडे, लक्ष्मण पवार, माजी उपसरपंच संजय पाटील, शहाजी लेंगरे, गणेश लेंगरे, अंकुश लेंगरे, महेश जाधव, चंद्रकांत सरगर, शंकर लेंगरे, श्याम धायगुडे, वसंत लेंगरे, अशोक लेंगरे, नितीन लेंगरे, अनिल लेंगरे, शिवाजी धायगुडे, कांता लेंगरे, गोपाळ माळी, विशाल इरकर, महेश लेंगरे, वसंत लेंगरे, धनाजी लेंगरे, उमाजी बोडरे, विशाल बोडरे, देवा चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन सरपंच शहाजी लेंगरे यांचा माजी सरपंच तुषार लवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.