कुसमोड येथील जिल्हा परिषद शाळेस स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्रदान

पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लक्ष्मीनगर शाळेस मरवडे, ता. मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रिडा मंडळाच्या वतीने स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, शिवाजी काळुंखे, छत्रपती परिवाराचे सुरेश पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते हा देण्यात आला.
हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक सुहास कोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत घडयाळे, उपाध्यक्षा स्वाती गारुळे, माजी अध्यक्ष व शिक्षणतज्ञ प्रा. संजय पाटील, नंदीनी मदने, पल्लवी मदने, पुनम लवटे, ज्ञानेश्वर मदने, नाथा मदने, मनोज मदने, संजय मदने, राहुल मदने, सहशिक्षक सुनिल डुरे, शिक्षक नेते रमेश सरक सर, अमोल नष्टे, राजु चौरे सर यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदरचा पुरस्कार जिल्हा परिषद लक्ष्मीनगर शाळेस प्रदान करणयात आला.
सदरचा पुरस्कार हा शाळा व्यवस्थापन समितीचे आजी, माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी या सर्वांनी आजवर केलेल्या सहकार्यामुळेच मिळाला असून शाळेला सर्वांगीण विकास करता आला आहे. सर्व सोयी सुविधा असणारी पिलीव केंद्रातील ही एक आदर्श शाळा असल्याचे मत शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.