लाडकी बहिण योजना शासकीय समितीच्या तालुकाध्यक्ष पदी बाळासाहेब सरगर यांची निवड

माळशिरस (बारामती झटका)
राज्यातील महायुतीच्या सरकारने लागू केलेली सर्वसामान्य महिलांसाठी असणारी महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेसाठी सरकारने 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा व सर्वांना त्याचा लाभ मिळावा यासाठी शासकीय कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीने नियुक्ती झाली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कमिटीची स्थापनेचे पत्र तयार केले आहे. यामध्ये अध्यक्षपदी बाळासाहेब सरगर व सदस्य पदी शिवसेनेचे सतीश सपताळे व राष्ट्रवादीचे दत्तात्रय ढेकळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या निवडबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब सरगर म्हणाले ही, योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी यापूर्वीही गाव भेट दौरा केला आहे. परंतु, तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ होईल, याची काळजी घेतली जाईल. महायुतीची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने विधानसभेपूर्वी सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार व भारतीय जनता पार्टीने टाकलेल्या विश्वासास पात्र राहणार.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.