लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! लाडक्या बहिण योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू
मुंबई (बारामती झटका)
२०२४ या वर्षात महाराष्ट्र सरकारने अनेक विविध योजना सुरू केल्या आहेत. महिलांसाठी देखील अनेक योजना सुरू केल्या आहेत. परंतु, त्यातील लाडकी बहीण योजना खूपच गाजली. जुलै २०२४ पासून या योजनेला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.
या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक बहिणींना ६ हफ्ते आलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत ९००० रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक
महिलांनी उशिरा अर्ज केलेला आहे किंवा काही महिलांनी अर्ज देखील केलेला नाही. आता त्या महिलांना देखील अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे. आणि त्याची प्रोसेस कधी सुरू होणार आहे ? याची अनेकजण वाट पाहत आहेत.
आणि आता याच लाडक्या बहिणी योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रोसेस बद्दल एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे आता ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा अर्ज केला नाही. त्यांच्यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस पुन्हा एकदा सुरू केली जाऊ शकते. पुढील आर्थिक वर्षात महिलांना दर महिना 2100 रुपये देण्याची घोषणा केली आहे. आणि ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते. परंतु त्यासाठी महिलांना काही महिने वाट पाहावी लागणार आहे. परंतु, आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
या आधी राज्यातील जवळपास १२ लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांचे आधार कार्ड लिंक नव्हते. अशा महिलांना या योजनेचे पैसे आले होते. परंतु, ज्या महिलांनी उशिरा होईल का होईना ? परंतु आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक केलेले आहे. त्यांना डिसेंबर महिन्यात एकूण ९००० रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही या योजनेचा अर्ज केला नाही. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.