लाडक्या शिक्षकांना ग्रामस्थांनी दिला भावपूर्ण निरोप…

वेळापूर (बारामती झटका)
शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ माजी विद्यार्थ्यांची उसळलेली गर्दी….त्यांच्यासह उपस्थित सर्व पुरुष व महिलांचे पाणावलेले डोळे….आणि एक अस्वस्थ करणारी शांतता…..हे दृश्य आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी नं. १ येथील….निमित्त होतं शाळेतील लाडक्या शिक्षकांच्या निरोप समारंभाचं…!
शाळेचे मुख्याध्यापक डाॅ. प्रेमनाथ रामदासी सर, विज्ञान विषयशिक्षक श्री. पांडुरंग वाघ सर व उपशिक्षक श्री. प्रदीप कोरेकर सर यांची संगणकीय प्रणालीद्वारे बदली झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष मा. अमृतभैय्या माने देशमुख, व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. कमलाकर माने देशमुख, श्री. संदीप माने देशमुख, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मिलिंद माने देशमुख, उपाध्यक्षा मा. रेहाना शेख, श्री. संभाजीराव माने देशमुख, श्री. शकील शेख, श्री. आडत, श्री. आकाश माने देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कु. मैथिली माने देशमुख व कु. श्रावणी पताळे या विद्यार्थीनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मा. अमृतभैय्या यांनी निरोपमूर्ती शिक्षकांनी केलेल्या परिश्रमांमुळेच शाळा प्रगतीपथावर पोहचल्याचे सांगून सर्वांचे कौतुक केले. यावेळी निरोपमूर्ती शिक्षकांनीही आपल्या भावनांना वाट करुन दिली.
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. मिलिंद माने देशमुख यांनी कल्पकतेने अल्पावधीत सर्व शिक्षकांनी आयुष्यभर लक्षात राहील असे स्मृतिचिन्ह (ट्राॅफी) भेट दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



