लक्षवेधी बातमी; वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणार..
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांना विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील यांच्या मागणीची घेतली दखल.
नागपूर (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळामध्ये विविध प्रश्नांची सोडवणूक होत असते. माळशिरस तालुक्यातील वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे, असे निवेदन विधानपरिषद सदस्य तथा आश्वासन समिती प्रमुख श्रीकांतजी भारतीय यांच्याकडे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सोलापूर जिल्हा सहप्रभारी व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील यांनी दिले होते. सदरच्या निवेदनाच्या अनुषंगाने आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे श्रीकांतजी भारतीय यांनी पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालय मंजूर होण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण व अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने अनेक रुग्णांची हेळसांड व कुचंबना होत आहे. के. के. पाटील यांनी सदरचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा यासाठी श्रीकांतजी भारतीय यांच्याकडे निवेदनातून मागणी केलेली होती. सदरच्या निवेदनाची दखल घेऊन सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आवश्यकता असल्याने कार्यक्षम आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याशी पत्र व्यवहार करून मंजूर करण्यास शिफारस दिलेली आहे. त्यामुळे लवकरच वेळापूर येथे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.