लयभारी युट्युब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांच्यावर माळशिरस पोलीस स्टेशन येथे एनसीआर दाखल…

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विशेष निमंत्रित कार्यकारणी सदस्य डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी प्रसारमाध्यमात झालेल्या अब्रूनुकसान/मानहानीकारक बातम्या प्रसिध्द केल्याची तक्रार माळशिरस पोलीस स्टेशन येथे दि. ०७/०३/२०२५ रोजी तक्रारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे लयभारी युटूब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांच्याविरुध्द माळशिरस पोलीस स्टेशन येथे एनसीआर दाखल करण्यात आलेला आहे.
डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, यातील विरोधक यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे सो. यांच्याशी संबंधीत गुन्ह्याचा मा. न्यायालयामध्ये निकाल लागुन त्यामध्ये त्यांची निर्दोष मुक्ताता होऊन देखील त्या घटनेच्या अनुषंगाने लयभारी युटूब चॅनेल वरती मा. ना. जयकुमार गोरे सो. व आमच्या वरिष्ठ नेत्यांविषयी सदर चॅनलचे संपादक आरोपी तुषार खरात यांनी राजकीय लोकांना हाताशी धरून विशिष्ठ आक्षेपार्ह असंविधानीक भाषा वापरून बदनामी कारक व्हिडीओ व मजकूर प्रसिध्द केले आहेत. त्यातुन मा. मंत्री महोदयांची व आमच्या वरिष्ट नेत्याची लयभारी या युट्युब चॅनेलवर जनमाणसातील प्रतीमा मलीन केली म्हणुन त्या आरोपीवर योग्य ती कारवाई व्हावी. त्याविषयी तक्रार नोंदवून पुढील योग्य ती कारवाई व्हावी.
असा तक्रारी अर्ज दिल्यानंतर माळशिरस पोलीस स्टेशन येथे लयभारी युटूब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांच्यावर भारतीय न्याय संहिता बी.एन.एस. २०२३ कलम ३५६(२) प्रमाणे एनसीआर दाखल झालेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनटक्के करत आहेत. यावेळी यावेळी मा. नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, नगराध्यक्ष विजय देशमुख, नगरसेवक वैभव जानकर, दादासाहेब शिंदे, महादेव कोळेकर, रणजीत ओहोळ, आबा धाईंजे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डीवायएसपी राहुल मडावी, पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांची भेट घेऊन तक्रार देण्यात आली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.