बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीवरील गुन्ह्याला स्थगिती

मुंबई (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांचे नियंत्रण असलेल्या बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनी विरोधात भाजप आमदार राम शिंदे यांच्या तक्रारीच्या आधारे दाखल केलेल्या गुन्ह्याला न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला होता. अशातच बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीने सरकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप करत आमदार राम शिंदे यांनी तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका कंपनीचे कार्यकारी संचालक सुभाष गुलावे यांनी दाखल केली. या याचिकेची न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने दखल घेतली आणि बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी विरोधातील गुन्ह्याला स्थगिती देत गुलावे यांच्या याचिकेवर ११ सप्टेंबरला सुनावणी निश्चित केली आहे. राम शिंदे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तूर्तास कुठलीही कारवाई करू नका, असे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng