ताज्या बातम्यासामाजिक

लोहार समाज आंदोलक दादासाहेब कळसाईत यांच्या आंदोलनास कोल्हापूरकरांचा पाठिंबा

माढा (बारामती झटका)

लोहार समाज आंदोलक दादासाहेब कळसाईत यांनी लोहार समाजाला अनेक मागण्या मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण केले आहे. या उपोषणाला कोल्हापूरकरांनी पाठिंबा दिला आहे.

लोहार समाजासाठी मागण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे –
१) ब्राह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक महामंडळाचे नाव बदलण्यात यावे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याची सरदार लोहपुरुष भिमाजी लोहार किंवा लहुजी लोहार या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळास नाव द्यावे. त्यामुळे त्यांच्या स्वराज्याच्या पराक्रमाचे योगदानाचे स्मरण टिकेल. स्वराज्याच्या स्थापनेत सहभागी असणारे लहुजी लोहार व भीमा लोहार यांचे शासनाने स्मारक बांधावे.
२) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवरचे सर्व निकष लोहार आर्थिक विकास महामंडळास लावावेत व लोहार आर्थिक विकास महामंडळास आर्थिक निधी उपलब्ध करावा.
३) लोहार समाजातील प्रत्येक कुटुंबाला गावामध्ये दोन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी.
४) लोहार समाजाला व्यवसायासाठी लागणारे सर्वसाहित्य पंचायत समिती द्वारे मोफत मिळावे‌. आयरन, भाता व इतर सर्व आवश्यक ते साहित्य मिळावे.
५) लोहार आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक हे लोहार समाजातील सदस्य असावेत. त्यामुळे समाजातील अडचणी दूर होतील. जिल्हा नियोजन समितीवर लोहार समाजातील एक सदस्य घेण्यात यावा.
६) लोहार समाजातील प्रत्येक कुटुंबावर अन्याय केला जातो त्या अन्यायाला आमच्या कुटुंबांमधील काही कुटुंबे गरीब असल्यामुळे त्यासाठी कायद्यामध्ये वेगळी तरतूद करावी जेणेकरून लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही. अर्जदारांची वय १८ ते ५० वर्षे दरम्यान करावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रूपये ९८,००० रु., शहरी भागासाठी रुपये १,२०,००० पेक्षा जास्त नसावे.
७) लोहार आर्थिक विकास महामंडळ मार्फत लोहार समाज विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात यावी. या योजने अंतर्गत देशांतर्गत शिक्षणासाठी रुपये दहा लाख आणि परदेशातील शिक्षणासाठी वीस लाख पर्यंतचे कर्ज चार टक्के वार्षिक व्याजदराने उपलब्ध करावे. .
८) लोहार समाजातील जे मुलं मुली पुण्यात शिक्षण घेतात त्या मुलासाठी अल्प दरात विनाशुल्क वस्तीगृहाची सोय करून द्यावी.

या प्रमुख मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलनाला बसलेले सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे टाकळी टेंभुर्णी येथील रहिवासी दादासाहेब कळसाईत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तातडीने शिष्टमंडळ कोल्हापूरहून गेले होते‌.

सदरच्या शिष्टमंडळात ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिगंबर लोहार, ओबीसी जनमोर्चाचे बाळासाहेब लोहार, सुतार लोहार समाजाचे जेष्ठ नेते सुखदेव सुतार, सचिन सुतार तसेच अकलूज येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट अविनाश काळे यांचा समावेश होता.

आंदोलनकर्ते दादासाहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून ओबीसींचे नेते व ओबीसी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे साहेब यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. आंदोलनातील मागण्या माननीय मुख्यमंत्री बहुजन कल्याण मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन तसेच त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रकाश शेंडगे यांनी दिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button