ताज्या बातम्या
लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे यांना पत्नीशोक; सायली जवळकोटे यांचे निधन

सोलापूर (बारामती झटका)
सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे (वय 54 ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी 2 वाजता वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपभवानी रोड येथे होणार आहे.
सौ. सायली सचिन जवळकोटे यांनी आजपर्यंत संचार, लोकमतसाठी लिखाण केले. आकाशवाणी अन् आजतक चॅनेलसाठीही काम केले. ‘लोकमत सोलापूर’चे कार्यकारी संपादक श्री. सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.