लोकनेते कै. सूर्यकांतदादांचे योगदान अविस्मरणीय – रजनीश बनसोडे

वेळापूर (बारामती झटका)
लोकनेते कैलासवासी सूर्यकांतदादा माने देशमुख यांचे योगदान वेळापूर गावासाठी अविस्मरणीय लाभले असून त्यांच्यामुळेच आज पाणीपुरवठया सारख्या मोठ्या योजना साकार होताना दिसत आहेत. त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे असे मत वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे यांनी व्यक्त केले.
विकास सेवा सहकारी सोसायटी, वेळापूरच्या वतीने लोकनेते सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग माने देशमुख यांच्या हस्ते लोकनेते कै. सूर्यकांत माने देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विकास सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, उपसरपंच बापूराव मुंगुसकर, जयराज माने पाटील, सौरभ इंगळे, जयदीप देशमुख, वीरकुमार दोषी, माजी उपसरपंच शंकरराव काकुळे, माजी सरपंच विश्वास वाघे, काशिनाथ आडत, शंकर आडत, शिवाजी मोहिते, भाऊसाहेब चोरमले, सूर्यकांत मिरगे, आनंद शिरसागर, अशोक माने देशमुख सर, अण्णासाहेब चव्हाण, दीपक माने देशमुख, शरद साठे, भैय्या कोडग, मनोज जाधव, शरद साळुंखे, मधुकर इंगळे, भैया चंदनशिवे, लखन मंडले, विनायक देशपांडे, उमेश बनकर, रविराज गायकवाड, दीपक चव्हाण, संदीप माने देशमुख, रंगादादा माने देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सरपंच रजनीश बनसोडे म्हणाले की, कै. सूर्यकांतदादांच्या काळात शब्दाला किंमत होती. दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व म्हणून सूर्यकांतदादांची ओळख होती. यावेळी अण्णासाहेब चव्हाण यांनीही आपल्या भाषणातून दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदराव माने देशमुख, बाळासाहेब माने देशमुख, विश्वजीत माने देशमुख, चंद्रकांत क्षीरसागर, अर्जुन भाकरे, अप्पा अडसूळ, नानासो सावंत, संजय करमाळकर आणि सोनू साखरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन महादेव ताटे यांनी केले तर आभार सचिव भागवत मिले यांनी मानले.

पाणपोईचे उद्घाटन…
कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवासी व नागरिकांची तहान भागवण्यासाठी नेहमीप्रमाणे सोसायटीच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.