लोकनेते कै. सुर्यकांतदादांनी प्रत्येकाशी आपुलकीचे नाते जपले – प्रकाशबापू पाटील

अकलूज (बारामती झटका)
लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रत्येक लोकांशी आपुलकीचे नाते निर्माण केले होते. विकासाचा ध्यास घेऊन आपल्या परिसराचा त्यांनी सर्वांगीण विकास केला, असे मत पानिव येथील श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांनी व्यक्त केले.
वेळापूर गावचे सुपुत्र, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी इंद्रनील मंगल कार्यालय या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या कार्याला उजाळा मिळावा, या उद्देशाने वेळापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
प्रथमतः लोकनेते कै. सुर्यकांतदादा माने देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, शरदबापू मोरे, विक्रमभाऊ माने देशमुख, अमृतभैया माने देशमुख, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अमरभाऊ माने देशमुख, मंडल अध्यक्ष सुजयभैया माने पाटील, हंसराजभैय्या माने पाटील, जयराजभैय्या माने पाटील, श्रीराज माने पाटील, पोलिस पाटील सतीशराव (बप्पा) माने देशमुख, मार्केट कमिटीचे माजी संचालक आनंदराव बापू माने देशमुख, धैर्यशील माने देशमुख, भारत माने देशमुख, शिवाजी माने देशमुख, किसन बापू माने देशमुख, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब धाईंजे, भाजपाचे नेते बाळासाहेब सरगर, आरपीआय तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, नितीन मोहिते, रामभाऊ कचरे, मळोली गावचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, शंतनु देशमुख, अजित बोरकर, महादेव कावळे, काकासाहेब जाधव, सहायक पोलीस निरीक्षक गोसावी साहेब, मदनसिंह माने देशमुख, अमर भिमराव माने देशमुख, राहुल माने देशमुख, दत्तात्रय माने, हरी मेटकरी, अर्जुन भाकरे, अप्पा अडसूळ, गोपाळराव घार्गे देशमुख, बाळासाहेब वावरे, गणेश पाटील, गोरख मगर, दत्तू तात्या माने, विरकुमार दोषी, गणेश चव्हाण, उमेश भाकरे, महेश शिंदे, उमेश बनकर, सुशांत जाधव, श्रीधर देशापांडे, माऊली मगर, अमोल पताळे, पिनू येडगे, ओंकार खराडे, दिपक चव्हाण, समाधान मगर आदीसह सूर्यकांतदादावर प्रेम करणारे ज्येष्ठ नागरिक दत्तुभाऊ बनकर, लक्ष्मण सावंत, मल्हारी मामा शिंदे, पांडुरंग तात्या पनासे, चंद्रकांत आडत, बाळासाहेब आडत, भिवाजी विठ्ठल सावंत, किसन बनकर, अमरकाका माने देशमुख आदिंसह आजी माजी ग्रा. सदस्य, सोसायटी सद्स्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अजिंक्य खराडे, संभाजी माने देशमुख, एस. डी. हंबीरे, सार्थक चोरमले, प्रथमेश बनसोडे, वैष्णवी बाबर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर खो खो खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेले कृष्णा बनसोडे, प्राजक्ता बनसोडे, आश्विनी मांडवे, आरमान शेख, अकबर शेख, शंभूराजे चंदनशिवे आदी युवा खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. हेमंत माने देशमुख यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना प्रकाशबापू पाटील म्हणाले की, लोकनेते कै. सूर्यकांतदादांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले होते. त्यांनी जीवनात माणसे कमवली. लोकांच्या अडीअडचणीला धावून ते गेलेच पण, त्यापुढेही जाऊन गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडली. सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे, असेही ते यावेळी म्हणाले.
सदर कार्यक्रमात लोकनेते कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या कार्याला अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण देशापांडे, सुनील शिंदे, राजकुमार बनसोडे, शरद साठे, नाना माने, नाना सावंत, सुरज साखरे, गणेश आडत, विकास माने, अशपाक मुलाणी, महेश साठे, दत्तात्रय माळी, दिलिप साठे, सतीश खराडे तसेच विकास सोसायटीचे सचिव दिपक माळवदकर, संजय करमाळकर, शिवाजी आडत यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सोसायटीचे संचालक श्रीधर देशपांडे यांनी केले तर शेवटी आभार अमरभाऊ माने देशमुख यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



