लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांचं आपुलकी, विश्वास, जिव्हाळा, विकासाचं काय नातं असावं, याची प्रचिती….
उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असे लोकप्रिय दमदार लोकप्रतिनिधी राम सातपुते यांचे समाजसेवेचे कार्य सुरूच…
सोलापूर (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद व समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे कर्तव्यनिष्ठ सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या भेटी घेऊन लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी यांचं आपुलकी, विश्वास, जिव्हाळा व विकासाचं काय नातं असावं, याची प्रचिती सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला पहावयास मिळालेली आहे. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असे लोकप्रिय दमदार लोकप्रतिनिधी राम सातपुते यांचे समाजसेवेचे कार्य सुरूच आहे.
सर्वसामान्य व गोरगरीब ऊसतोड कामगार असणारे श्री. विठ्ठल व स्वर्गीय सौ. जिजाबाई सातपुते दाम्पत्यांच्या घरात राम सातपुते यांचा जन्म झाला. प्रतिकूल अशा परिस्थितीत स्वकर्तुत्वाने परिस्थितीवर मात करून आई-वडिलांचे संस्कार घेऊन लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुशीत तयार झालेले राम सातपुते यांनी शिक्षण पूर्ण करीत असताना अंगामध्ये विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी चळवळ कायम ठेवलेली होती. स्वकर्तृत्व वक्तृत्व यामुळे कॉलेज जीवनात अनेक संघाच्या व भाजपच्या नेत्यांशी संपर्क येऊन विद्यार्थी परिषद युवा मोर्चामध्ये काम करण्याची संधी मिळाली. याच संधीचे सोने करून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांच्या सहकार्याने माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळालेली होती. माळशिरस तालुक्याच्या जनतेने आमदार राम सातपुते यांना तालुक्याची सेवा करण्याची संधी दिलेली होती. घरातील प्रतिकूल परिस्थिती, गरिबीचे चटके खाल्लेले असल्याने समाजाच्या अडीअडचणी जवळून पाहिलेल्या नाही तर अनुभवलेल्या असल्यामुळे माळशिरस विधानसभेचे राम सातपुते आमदार झाल्यानंतर सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी जनता दरबार सुरू केला. सुरुवातीला जनता दरबार काय असतो याची कल्पना माळशिरस तालुक्यातील जनतेला नव्हती. जनता दरबारामधून जनतेची व्यक्तिगत वसार्वजनिक कामांची सोडवणूक होत असल्याची लोकांमध्ये चर्चा होत गेली आणि दिवसेंदिवस जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळत गेला.
सुरुवातीच्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे सरकारला जागं करण्याकरता अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढावे लागले. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ व्हावे यासाठी विधान भवनाच्या समोर गळ्यामध्ये मोटर आणि स्टार्टर घालून आंदोलन करणारे महाराष्ट्रातील एकमेव शेतकऱ्यांचा आमदार म्हणून राम सातपुते यांच्याकडे पाहिले जात होते. सरकार विचाराचे नव्हते तरीसुद्धा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी कार्य सुरूच होते. योगायोगाने अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर येऊन भाजप समवेत सरकार स्थापन केले. महायुतीच्या सरकारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघात हजारो कोटींची कामे केली. गेल्या 70 वर्षांमध्ये जाणीवपूर्वक माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात प्रलंबित ठेवलेल्या कामांना वाचा फोडण्याचे काम लोकप्रतिनिधी राम सातपुते यांनी केलेले होते.
सदरची कामे करीत असताना प्रशासनातील अधिकारी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख अशा अधिकाऱ्यांशी आपुलकी, विश्वास, जिव्हाळा आणि विकासाचं नातं जपलेलं होतं. महायुतीची सत्ता असताना काही महिने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या कार्यकालानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचाही सहवास आला. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी लोकप्रतिनिधी यांच्या नात्यावर अनेक कामांचा निपटारा होत असतो. गत निवडणुकीत लोकप्रतिनिधी राम सातपुते यांचा निसटता पराभव झालेला आहे. तरीसुद्धा, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असे लोकप्रिय दमदार लोकप्रतिनिधी राम सातपुते यांचे समाजसेवेचे कार्य सुरूच आहे.
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार कार्यरत आहे. राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे बोट धरूनच प्रवेश केलेले लोकप्रतिनिधी राम सातपुते यांना देवेंद्र फडवणीस यांचा आशीर्वाद आहे. तू चाल गड्या, तुला रं भीती कुणाची, याचा प्रत्यय येणाऱ्या काळामध्ये निश्चितच माळशिरस तालुक्यातील जनतेला येणार असल्याने माळशिरस तालुक्यात राम सातपुते लोकप्रतिनिधी असो अथवा नसो कायम सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या मनामध्ये घर केलेले आपला माणूस राहणार आहेत. मात्र, लवकरच विधान परिषद वरिष्ठ सभागृहात राम सातपुते यांचा आवाज घुमणार असल्याने कहो दिल से, राम सातपुते फिरसे, असे विरोधकांनी ध्यानात घ्यावे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Noemally I don’t read poost on blogs, butt I would
likle to say that this write-up very pressured mee too check out and doo so!
Your wrtiting taswte hhas ben amazed me. Thanks, qjite greeat post.