लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते श्री राम ठेव योजनेचा शुभारंभ होणार…

बळीराजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तीन महिन्यात एक कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण.
चेअरमन संतोषमालक काळे, व्हा. चेअरमन बाळासाहेब पांढरे मार्गदर्शनाखाली दैदीप्यमान वाटचाल
नातेपुते (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभ हस्ते श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 20 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता श्री राम देव योजनेचा शुभारंभ 20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 05 वा. बळीराजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नातेपुते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
बळीराजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संतोषमालक चंद्रकांत काळे, व्हॉइस चेअरमन बाळासाहेब मारुती पांढरे, संचालक ॲड. रावसाहेब भीमराव पांढरे, वैभव सुरेंद्र शहा, गणपत कृष्णा पांढरे, दत्तात्रय लक्ष्मण रुपनवर, आजेश मधुकर पांढरे, सौ. अनिता रामा कांबळे, मोहन जगन्नाथ वाघमोडे, नौशाद इब्राहिम आतार, सौ. भारती सुनील सोलनकर, ज्ञानेश्वर पांडुरंग सरक, मारुती दुर्योधन ढोबळे, सचिव अमोल महादेव खंडागळे यांनी नातेपुते येथे पतसंस्थेचा तीन महिन्यापूर्वी शुभारंभ केलेला होता. संचालक मंडळ यांच्यावर विश्वास ठेवून संस्थेचे सभासद, खातेदार, हितचिंतक यांनी तीन महिन्यात एक कोटी पेक्षा जास्त ठेवींचा टप्पा पार केला असून कर्ज वाटपातसुद्धा कोटीचा टप्पा पूर्ण केलेला आहे.


सध्या देशामध्ये श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध स्तरांवर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर श्रीराम ठेव योजना सुरू करण्यात येत आहे. सदरच्या ठेवीवर 13 महिने ते दोन वर्षाच्या ठेवीवर अर्धा टक्का ज्यादा व्याजदर पतसंस्था देणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.