ताज्या बातम्यासामाजिक

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी गोरडवाडी येथील बाळ्याच्या खंडोबास सभा मंडप मंजूर करावा भाविकांची इच्छा..

गोरडवाडी (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी गोरडवाडी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणारे बाळ्याचा खंडोबा मंदिरासमोर सभा मंडप मंजूर करावा, अशी खंडोबा भाविकांची इच्छा आहे.

माळशिरस-म्हसवड रोडवर गोरडवाडी गाव आहे. सदरच्या गावात ग्रामदैवत बिरोबा मंदिरासारखी अनेक मंदिरे आहेत. मारुती मंदिर, श्रीनाथ मंदिर, खंडोबा मंदिर यांसह अनेक मंदिरे आहेत. त्यामधील मूळ स्थान असणारे बिरोबा मंदिर, मारुती मंदिर, नाथ मंदिर, पांढरे देऊळ मंदिर अशा मंदिरांना सभा मंडप आहेत.

बाळे सोलापूर येथील स्थान असणारे खंडोबा मंदिर या ठिकाणी मंदिरास शिखर व कळस आहे. सदरच्या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी व इतर कार्यक्रमासाठी आल्यानंतर ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळण्याकरता सभामंडपाची आवश्यकता आहे. यासाठी बाळ्याचा खंडोबा मंदिरासमोर दहा लाख रुपयेचा सभा मंडप उभा करण्याकरता भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भाविकांच्या मागणीकडे लक्ष देऊन सभामंडप मंजूर करावा, असे बाळ्याचा खंडोबा भाविक भक्त व समस्त गोरडवाडी ग्रामस्थांची मागणी आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button