लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या गाडी, बंगला, पाहणाऱ्यांची पोटदुखी वाढली..
साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था यामधून अवैध मार्गाने पैसा न कमवता उद्योग व्यवसायातून प्रगती केलेली आहे..
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी फॉर्च्युनर गाडी, बंगला, लक्ष्मीपूजनला सोने, पैसे आणले कुठून, असे सोशल मीडियावर लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याविषयी गाडी, बंगला पाहणाऱ्यांची पोटदुखी वाढलेली आहे. खऱ्या अर्थाने ऊसतोड मजुराचा पोरगा म्हणून सांगत असताना त्यांची अभिमानाने छाती फुगत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांचा राजकीय आशीर्वाद व दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या आई-वडिलांचे संस्कार घेऊन आमदार राम सातपुते यांना माळशिरस तालुक्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा अनेक गावामध्ये दारापर्यंत पोहोचवलेली आहे.
आमदार झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून उद्योग, व्यवसायिक यांचा संबंध येत असतो. अशाच उद्योग व्यवसायामध्ये मित्रपरिवारांच्या सहकार्याने आमदार म्हटल्यानंतर साजेस असे घर, गाडी, राहणीमान असावे लागते. यासाठी त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये स्वतःचे घर बांधून गाडीमध्ये फिरत आहेत. खुरपायला जाणाऱ्या महिलेला सुद्धा सणवारामध्ये अलंकार, लक्ष्मीपूजनाच्या वेळेला लक्ष्मी व अलंकार पुजावे, अशी इच्छा असते. सौ. संस्कृतीताई ह्या सुद्धा भारतीय संस्कृतीचे जतन करणाऱ्या महिला आहेत. त्यांनी लक्ष्मीपूजनाला दागिने पुजले, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
आमदार राम सातपुते यांनी उद्योग व्यवसायातून कष्टातून मिळवलेली संपत्ती आहे. त्यांनी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था यामधून अवैध मार्गाने पैसे मिळवलेले नाहीत. कोणाच्या मुंड्या मुरगळलेल्या नाहीत किंवा संस्थेतील कर्मचाऱ्यांना वर्गणी गोळा करायला लावलेली नाही. स्वकष्टातून कमवलेले असल्याचे आमदार राम सातपुते यांचे समर्थक उघड उघड बोलत आहेत सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष व महायुतीने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर सोलापुरात पराभव होईल असे स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेऊन निकालापर्यंत आनंदित राहणाऱ्या कोणाचातरी गळ्यात बेल्ट असणाऱ्या लोकांनी 4 जूनला माळशिरस तालुक्यात माढा लोकसभा व सोलापूर लोकसभेच्या गुलालाचा पाऊस पडणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून आत्मविश्वासाने बोलले जात आहे.
आमदार राम सातपुते यांना न मागता उमेदवारी महायुतीने दिलेली आहे. उमेदवारी मागून मिळत नाही, त्याला कार्यकर्तुत्व असावे लागते. भ्रष्टाचाराचा कलंक नसावा लागतो. माळशिरस तालुक्यात रामराज्य निर्माण केलेल्या आमदार राम सातपुते यांना माळशिरस तालुक्यातील तमाम जनतेचा आशीर्वाद सोलापूर लोकसभेसाठी राहणार आहे. विजय निश्चित आहे, पोटदुखी वाल्यानो, वेट अँड वॉच… थोड्याच दिवसात पोटदुखी आपली बंद होईल, अशी आ. राम सातपुते समर्थकांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.