लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यामुळे फोंडशिरस येथील फोंडशिरस-कदमवाडी रस्ता ते पाटील वस्ती रस्त्याचा पन्नास वर्षाचा वनवास संपणार…

फोंडशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश प्रभारी व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी फोंडशिरस येथील फोंडशिरस-कदमवाडी रस्ता ते पाटीलवस्ती ग्रा.मा. नं. 676 या रस्त्याचा गेली 50 वर्ष प्रश्न भिजत घोंगडे होता. सदरच्या रस्त्यावर लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी 50 लाख रुपये मंजूर करण्यासाठी जिल्हा नियोजन यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा सुरू असल्याने गेल्या पन्नास वर्षाच्या प्रलंबित रस्त्याचा वनवास संपणार आहे..
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यात लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात विकासापासून कोसोदूर असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. फोंडशिरस येथील कदमवस्ती ते पाटीलवस्ती या रस्त्यासाठी स्थानिक नागरिक व सदरच्या रस्त्यावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व आजारी पेशंट, दुग्ध व्यवसायिक, शेतकरी बांधव यांना सदरच्या रस्त्यावरून कायम प्रवास करावा लागत होता.

सदरच्या रस्त्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा रस्त्याचा प्रश्न 50 वर्ष मार्गी लागलेला नव्हता. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी 50 लाख रुपये सदरच्या रस्त्यासाठी स्थानिक विकास कार्यक्रम जिल्हा नियोजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्यावरून ये-जा करणारे व स्थानिक नागरिक यांच्यामधून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या दमदार कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.