लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव उर्फ मामासाहेब मोटे यांची सदिच्छा भेट घेतली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रणजीतशेठ मोटे यांनी सन्मान केला.
माळशिरस ( बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव उर्फ मामासाहेब मोटे यांची माळशिरस येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा मोठे परिवार यांच्यावतीने माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रणजीतसिंह मोटे उर्फ शेठजी यांनी सन्मान केला. यावेळी तरंगफळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ तरंगे यांच्यासह मोटे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे काम मामासाहेब यांनी केलेले आहे. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये चळवळीमधील लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कायम पाठबळ दिलेले आहे. खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्याच्या परिवर्तनामध्ये मामासाहेब मोटे यांच्या परिवाराचे मोठे राजकीय योगदान आहे. माळशिरस तालुक्याचे प्रतिनिधित्व सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रामध्ये करून माळशिरस तालुक्यात सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे आधारवड असणारे मामासाहेब यांनी चार दशके जनतेची इमाने इतबारे सेवा केलेली आहे. सध्या प्रकृती साथ देत नसल्याने माळशिरस येथील सुप्रसिद्ध व सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे जनसेवा हॉटेल पाठीमागील निवासस्थानी दसऱ्यानिमित्त लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट देऊन उभय दांपत्य यांच्या तब्येतीची विचारपूस करून अनेक विषयांवर चर्चा केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Wonderful perspective! The points you made are very enlightening. For further information, visit: DISCOVER MORE. Excited to hear your views!