लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी बिनविरोध नगराध्यक्षा सौ. ताई सचिन वावरे यांचा सन्मान केला..
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या बिनविरोध नगराध्यक्षपदी सौ. ताई सचिन वावरे यांची निवड झाल्याबद्दल मानाचा फेटा, शाल, हार व श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे, ओंकार वावरे, राहुल रुपनवर आदी उपस्थित होते.
लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते आणि माळशिरस नगरपंचायत यामध्ये विकासात्मक आपुलकीच नातं निर्माण झाले आहे. माळशिरस नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध केलेला आहे.
बिनविरोध नगराध्यक्षा “ताई ” झालेल्या आहेत. निश्चितपणे “भाऊ” विकासासाठी निधी उपलब्ध करून कार्यकालामधील दमदार कामगिरी करतील, असा माळशिरसकरांना विश्वास आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.