लोकप्रिय दमदार मा. आ. आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त मळोली येथे रामभाऊ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

मळोली (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रामभाऊ चषक २०२६ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा हाफ पीच या स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टी मळोली यांच्या वतीने बुधवार दि. ११/०३/२०२६ रोजी अकलूज-सांगोला रोड लगत, घोरपडे पेट्रोल पंपाशेजारी मळोली येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते हे असणार आहेत.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्रशांत वासुदेव जाधव (यल्लमा देवी मुख्य पुजारी, मळोली SP ज्वेलर्स आयोध्या UP) यांच्यावतीने ३१००१ रू., द्वितीय पारितोषिक चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव (जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर पिलीव गट) यांच्यावतीने २१००१ रु., तृतीय पारितोषिक पांडुरंग निवृत्ती जाधव (ग्रामपंचायत सदस्य, मळोली) यांच्या वतीने ११००१ रू., चतुर्थ पारितोषिक शिवाजी चांगदेव पवार (मा. ग्रामपंचायत सदस्य, मळोली) यांच्या वतीने ७००१ रू., पाचवे पारितोषिक सुनील महादेव जाधव (प्राध्यापक एम आय टी कॉलेज, आळंदी) यांच्यावतीने ४००१ रू., असणार आहे.

तसेच उत्कृष्ट फलंदाज साठी राजरत्न मोरे यांच्या वतीने बॅट, उत्कृष्ट गोलंदाज साठी संतोष घोरपडे यांच्या वतीने ट्रॅक सूट, उत्कृष्ट झेल साठी भीमराव मोरे यांच्या वतीने ट्रॅक पॅन्ट आणि गॉगल तर उत्कृष्ट जलद अर्धशतक साठी संज्योत घोरपडे यांच्या वतीने टी-शर्ट व कॅप देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी हनुमंत यशवंत जाधव (शि. शं. सो. मा. व्हाइस चेअरमन, मळोली) यांचे ट्रॉफी सौजन्य, शशांक जाधव पाटील (भाजप माळशिरस मंडळ उपाध्यक्ष) यांचे बॉल सौजन्य तर स्वप्निल शिवाजी जाधव (अष्टविनायक ॲक्वा) यांचे पाणी सौजन्य असणार आहे.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सामना समिती विशाल घोरपडे मो. ९६५७२४४०९०, संज्योत घोरपडे मो. ९६२३१५१६५१ आणि तुषार घोरपडे मो. ९५२९६४९७८४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरी मळोली पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमींनी क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



