लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची विधानसभेनंतर लोकप्रियता वाढली, तशीच जबाबदारी सुद्धा वाढली…

माळशिरस तालुक्यातील प्रस्थापित व पारंपरिक विरोधक यांना न जुमानता जनतेचा स्वयंस्फूर्तीने संपर्क वाढला..
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा विधानसभेच्या निवडणुकीत निसटता पराभव झालेला होता. विधानसभेच्या निवडणुकीनंतर माळशिरस विधानसभा मतदार संघात माजी आमदार राम सातपुते यांची जनसंपर्कातून लोकप्रियता वाढलेली आहे. तसेच माळशिरस तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या असल्याने जबाबदारीसुद्धा वाढलेली आहे.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात प्रस्थापित व पारंपारिक विरोधक यांचेच साटेलोटे तडजोडीचे राजकारण होते. सध्या माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे आधारवड बनलेले राम सातपुते यांना प्रस्थापित व पारंपारिक विरोधक यांना न जुमानता जनतेचा स्वयंस्फूर्तीने संपर्क वाढलेला पाहावयास मिळत आहे.
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेत गेल्या ५० वर्षापासून उपेक्षित असलेल्या भागांचा विकास केला. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात पिढ्यान पिढ्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या २२ गावांचा निरा-देवधर चा प्रश्न पहिल्यांदा विधानसभेत मांडून सदरच्या प्रकरणाला वाचा फोडलेली होती. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेत निरा-देवधर चा प्रश्न मांडून सातारा जिल्ह्यातून रखडलेल्या प्रश्नाला गती दिलेली आहे. सध्या नीरा-देवधर चे काम प्रगतीपथावर आहे.
राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात जनता दरबार संकल्पना पहिल्यांदा यशस्वीपणे राबवून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला हक्काचे व्यासपीठ निर्माण केलेले होते. जनता दरबारामध्ये अनेकांनी आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक कामांची सोडवणूक केलेली आहे. माळशिरस तालुक्यात अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त असलेले व उपचार करण्यास आर्थिक अडचण असलेल्या लोकांचे सर्व अवयवांची ऑपरेशन मोफत करून गोरगरिबांना दिलासा दिलेला होता. गोरगरीबांचे व पिढीतांचे आरोग्यदूत झालेले होते. विकासकामांना जास्तीत जास्त निधी आणून विकासकामांचे दमदार आमदार झालेले होते. सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होऊन अनेकांची कामे फोनद्वारे केलेली असल्याने जनतेमध्ये लोकप्रिय झालेले होते.
विधानसभेच्या निवडणुकीत प्रस्थापित व पारंपारिक विरोधक एकत्र येऊन सुद्धा गतवेळच्या मताधिक्यामध्ये वाढ होऊन एक लाख आठ हजाराचे मताधिक्य मिळालेले होते. निसटता पराभव सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या जिव्हारी लागलेला होता. केंद्रात नरेंद्रजी मोदी यांचे सरकार व राज्यात भाजप व महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन होऊन ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर माळशिरस तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाची तमा न बाळगता सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे कार्य लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचे सुरू आहे.
माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान राबवून ७१ हजार सभासदांचे उद्दिष्ट पूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. माळशिरस विधानसभेच्या धर्मपुरी पासून दसुरपर्यंत, कोथळे, कारुंडे पासून संगमपर्यंत, शिंदेवाडी पासून कोळेगावपर्यंत असे एक गाव, वाडी वस्ती किंवा घर नाही की राम सातपुते यांच्या विचाराचा कार्यकर्ता नाही. राम सातपुते यांनी गाव तिथं शाखा, घर तिथे कार्यकर्ता, अभियान सुरू केले आहे. तरुणांची फौज राम सातपुते यांच्या पाठीशी उभी राहून ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळत आहेत. केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने राम सातपुते यांच्या आजसुद्धा जनता दरबारातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत आहे. दिवसेंदिवस जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यामध्ये शाखा उद्घाटन प्रसंगी नवीन कार्यकर्ते जोडले जात आहेत. माळशिरस तालुक्यात भाजपचे संघटन दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिसणार आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात माळशिरस तालुक्याला लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यामुळे अच्छे दिन येणार, असा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेमधून विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.