लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवे गावचे माजी सरपंच अर्जुन दुधाळ यांचा डिजीटल फलक लक्ष वेधून घेत आहे…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुका डिजिटलमय झाला…
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचा वाढदिवस 12 मार्च रोजी आहे. माळशिरस तालुक्यात वाढदिवसानिमित्त गावोगावी, वाड्या-वस्त्यावर, चौकाचौकात, मुख्य रस्त्यावर, गावच्या प्रवेशद्वारावर सगळीकडे वाढदिवसाचे डिजिटल फलक झळकत असल्याने माळशिरस तालुका डिजिटलमय झालेला आहे. मांडवे गावचे माजी सरपंच श्री. अर्जुन दुधाळ यांनी मांडवे गावच्या हद्दीत नातेपुते शहर व बायपास या ठिकाणी लावलेला डिजिटल फलक लक्ष वेधून घेत आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये माळशिरस तालुक्यात विकास करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे. शरीराचा एकही अवयव विना ऑपरेशन राहिलेला नाही, अशा सर्व गोरगरीब व पिढीत जनतेला मोफत ऑपरेशन करून गोरगरिबांचे आरोग्यदूत बनलेले होते. माळशिरस तालुक्यात सत्तर वर्षांपासून अनेक रखडलेली व जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवलेली कामे करून लोकप्रियता मिळविलेली आहे. विकासाची दमदार कामे केलेली आहेत. विकासाच्या कामावर माजी सरपंच अर्जुन दुधाळ यांची जवळीकता आलेली आहे. अर्जुन दुधाळ शब्दाला पक्के आहेत. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व माजी सरपंच अर्जुन दुधाळ यांच्यामध्ये सल्लामसलत झालेली आहे. लवकरच अर्जुन दुधाळ भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मांडवे व मांडवे पंचक्रोशीत भारतीय जनता पक्षाचे काम जोमाने करतील, असा मांडवे पंचक्रोशीतील जनतेचा डिजिटल फलकावरून विश्वास वाढलेला आहे.
लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते व मित्रपरिवार स्नेहीजनांचा अभिष्टचिंतन सोहळा बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी सायंकाळी 06 वाजता श्रीराम निवासस्थान, 50 फाटा, मांडवे येथे आरोग्यदूत राम सातपुते वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे आधारवड बनलेले होते. माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये अनेक मतदारसंघांमधील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून जनतेच्या विकासकामांना प्राधान्य दिलेले होते. जनता दरबार संकल्पना माळशिरस तालुक्यात पहिल्यांदा यशस्वीपणे राबवून समाजामधील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे व्यक्तिगत व सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक केलेली होती. लोकप्रतिनिधी कसा असावा, त्यांचे कार्य कसे असावे, हे तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी दाखवून दिलेले असल्याने आपल्या परिवारातील हक्काचा कामाचा माणूस म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपलेपणा निर्माण केलेला आहे. आपल्या कार्यातून अनेक परिवारांचे सदस्य बनलेले होते. लोक हक्काने राम सातपुते यांना कामे सांगत असत. कितीतरी जनतेने काम झाल्यानंतर पेढे देऊन अभिनंदन केलेले आहे.
आमदार आणि जनता यांच्यामध्ये जवळीकता निर्माण करून कितीतरी कुटुंबांना आपल्या परिवारातील सदस्य आहेत, असा आपलेपणा निर्माण केलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तीन पिढीचे राजकारण व तीस वर्षाचा संघर्ष असे दोन गट एकत्र येऊन सुद्धा माळशिरस तालुक्यातील जनता एक लाख आठ हजारापेक्षा मताधिक्य देऊन आरोग्यदूत राम सातपुते यांच्या पाठीशी ठाम उभा राहिली आहे. निसटता पराभव झालेला असला तरी सुद्धा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून राम सातपुते यांच्याकडे आजही जनता पाहत आहे. केंद्रात व राज्यात भाजप विचाराचे सरकार असल्याने कामाचा सपाटा सुरू आहे. तोच रुबाब आणि तोच दरारा आज सुद्धा प्रशासनावर आहे. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची कामे होत आहेत. वाढदिवसानिमित्त आपला माणूस कामाचा माणूस म्हणून लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहीजनांचा अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.