लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची स्व. सौ. यशोदा बोराटे यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट..

फोंडशिरस गावचे सरपंच श्री. पोपटराव बाबा बोराटे यांना मातृषोक…
फोंडशिरस (बारामती झटका)
फोंडशिरस गावचे विद्यमान सरपंच श्री. पोपटराव बाबा बोराटे यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. यशोदा बाबा बोराटे यांचे सोमवार दि. 10/03/2025 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले होते. स्वर्गीय सौ. यशोदा बोराटे यांच्या परिवाराच्या सांत्वनपर भेटीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी बोराटे वस्ती येथे मंगळवार दि. 11/03/2025 रोजी सदिच्छा भेट घेऊन बोराटे परिवारांचे सांत्वन केले.

स्वर्गीय सौ. यशोदा बाबा बोराटे यांचे वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवार दि. 10/03/2025 रोजी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात पती बाबा यशवंत बोराटे, तीन मुले तात्याबा, पोपटराव व सावता, एक मुलगी बायडाबाई राऊत व नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
स्वर्गीय यशोदा बोराटे यांचा सुसंस्कृत व सोज्वळ स्वभाव असून त्या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्यांना सौभाग्य मरण आलेले आहे. त्यांचे माहेर फोंडशिरस येथील गोरे परिवारातील आहे. वस्ताद विष्णुपंत गोरे यांच्या त्या थोरल्या बहीण होत्या. त्यांच्यावर फोंडशिरस-पिरळे रोड, बोराटे वस्ती येथील राहत्या निवासस्थाना शेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम बुधवार दि. 12/3/2025 रोजी सकाळी 07 वाजता होणार आहे.

बोराटे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय सौ. यशोदा बोराटे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.