Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

डोंबाळवाडी येथे श्रीनाथ यात्रेनिमीत्त आज भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार…

डोंबाळवाडी कु. (बारामती झटका)

डोंबाळवाडी कु. ता. माळशिरस येथे श्री भैरवनाथ व जोगेश्वरी माता यात्रा महोत्सवानिमित्त श्रीनाथ मंदिर ट्रस्ट डोंबाळवाडी यांच्यावतीने आज शनिवार दि. १५/४/२०२३ रोजी दुपारी ४ वा. भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.

या कुस्ती मैदानामध्ये पंचायत समिती सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांच्या वतीने ७५ हजार रु. आणि जळभावीचे युवा नेते विशाल धाईंजे यांच्यावतीने ७५ हजार रुपयांसाठी पै. पवन सरगर कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा सदाशिवनगर विरुद्ध पै. विशाल राजगे उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सुळ सातारा यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे‌. भाजपाचे युवा नेते संदीपअण्णा सावंत आणि बारामतीचे युवा उद्योजक दत्तात्रय डोंबाळे यांच्यावतीने इनाम रुपये ५१ हजार रुपयांसाठी पै. प्रमोद सूळ मोरोची वस्ताद असलम काझी कुर्डूवाडी यांचा पठ्ठा विरुद्ध पै. आप्पा वळकुंदे वस्ताद विजय देशमुख माळशिरस यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे‌. दहिगावचे उपसरपंच विजय पाटील आणि गुरसाळेचे माजी सरपंच दिलीप कोरटकर यांच्यावतीने इनाम रुपये ५१ हजार रुपयांसाठी पै. शंकर कुंभार वस्ताद भालचंद्र पाटील फोंडशिरस यांचा पठ्ठा विरुद्ध पै. ओम माने वस्ताद ज्ञानदेव लोखंडे खुडूस यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. या कुस्ती मैदानाचे समालोचन फोंडशिरसचे पै. बापू कुंभार हे करणार आहे. तसेच यावेळी इनाम रु. १०० ते इनाम रु. ३००० रु. पर्यंतच्या कुस्त्या जोडल्या जातील.

यावेळी बार्शीचे माजी शिक्षक हनुमंत जाधव, पोलीस पाटील दत्तात्रय यादव, देशमुखवाडीचे प्रशांत देशमुख, डोंबाळवाडीचे मामासो वायसे, ग्रामविकास अधिकारी नारायण मोरे, कु. पूजा तरंगे डोंबाळवाडी महाराष्ट्र पोलीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त पैलवान, वस्ताद व कुस्ती शौकीन यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीनाथ मंदिर ट्रस्ट, श्रीनाथ गजी मंडळ व समस्त ग्रामस्थ डोंबाळवाडी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button
marsbahis hacklink market casibom