लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची धानोरे गावात तोफ धडाडणार…
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2025/01/IMG_20241229_182114_460-780x470.webp)
भारतीय जनता पक्षाच्या धानोरे गावच्या शाखेकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले..
वेळापूर (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत धानोरे, ता. माळशिरस या गावातील भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन गुरुवार दि. 06/02/2025 रोजी सायंकाळी 06 वाजता धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे. सदर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने धानोरे गावच्या शाखेकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
विधानसभेच्या चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांना माळशिरस तालुक्यातील मतदारांनी एक लाख आठ हजार पेक्षा जास्त मताधिक्य दिलेले होते. निसटता पराभव झाल्यानंतर लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढविण्याकडे भर दिलेला आहे. नातेपुते येथे भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियानात कार्यकर्त्यांना 71 हजार सभासद करण्याचे आवाहन केलेले होते. त्याप्रमाणे अनेकजण अडीचशे, पाचशे, हजार, दीड हजाराचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. धानोरे गावातील अण्णासाहेब दत्तात्रेय देवकते पाटील व शिवाजी चव्हाण तांदुळवाडी यांनी 1500 उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. तर सौ. मनीषा अर्जुन देवकते यांनी धानोरे गावातील 250 सभासद केलेले आहेत.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-06-at-2.18.45-PM-1024x1024.jpeg)
धानोरे सारख्या छोट्याशा गावामध्ये लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. धानोरे गावामध्ये महाविकास आघाडी कडून मॉकड्रिल करून ईव्हीएम घोटाळ्यामुळे धानोरे गावात व तालुक्यातील इतर गावात मते पडलेली आहेत, असा कांगावा केला जात आहे. याला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते शाखा उद्घाटन प्रसंगी आपल्या रोखठोक व परखड शैलीमध्ये उत्तर देतील, असा आत्मविश्वास धानोरे ग्रामस्थांना आहे. शाखा उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.