विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी काम करणारे श्री. गणेश चिवटे यांना भाजप जिल्हाध्यक्षपदाची संधी देणार का ?

विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी काम केल्यामुळे पक्षातून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती…
करमाळा (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांना सोलापूर जिल्हा परिषदमध्ये सभापती पदाची संधी दिलेली असल्याने त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. रिक्त झालेल्या जिल्ह्याध्यक्षपदासाठी श्री. गणेश चिवटे सह अनेकजण इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधामधील उमेदवारांचे काम केल्यामुळे भारतीय जनता पक्षातून शिस्तभंगाची कारवाई भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी पक्षातून निष्कषित केलेले होते.

विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी काम करणारे श्री. गणेश चिवटे यांना भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्षपदाची संधी देणार का ?, अशी भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावान नेते व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



