ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव यशस्वी करा – प्रांताधिकारी विजया पांगारकर

२५४ माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे

अकलूज (बारामती झटका)

निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे सर्वसामान्यांनी त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी काटेकोरपणे पालन करून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबर पारदर्शक वातावरणामध्ये निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही सर्व स्तरावरून व्यापक प्रबोधन होऊन लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे, आवाहन माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहिता जाहीर होताच निवडणूक निर्णय अधिकारी पांगारकर यांनी विविध प्रशासकीय प्रतिनिधी त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. तसेच पत्रकार परिषदही घेतली. यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, व्यवहारे मंडलाधिकारी सी. बी. लोखंडे आदि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी पांगारकर म्हणाल्या की, २५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्या दि. १६ ऑक्टोबर २०२४ अखेर ३,४७,७८७ असून यामध्ये पुरुष मतदार संख्या १,७९५५८ आहे. स्त्री मतदार संख्या १ लाख ६८ हजार १९७ आहे तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३२ इतकी आहे. यामध्ये सैनिक मतदारांची संख्या ४०० आहे.

माळशिरस मतदार संघात ३४५ मतदान केंद्र असून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर काम करण्यासाठी जवळपास २३०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तसेच निवडणुकीसाठी वेगवेगळी पथके तयार केली असून यामध्ये भरारी पथक, स्थिर निरीक्षण पथक, आचारसंहिता कक्ष अशा वेगवेगळ्या पथकांसाठी कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्याच बरोबर मशीन हँडलिंगची ट्रेनिंग ही देण्यात येणार असून उर्वरित जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांसाठी सहा सत्रामध्ये प्रशिक्षण व्यवस्था अकलूज येथे स्मृती भवन या ठिकाणी होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी पांगारकर यांनी दिली. तसेच ३४५ मतदान केंद्रापर्यंत ४६ बसेस व ३४ जीप मार्फत सर्व यंत्रणाचे येण्या-जाण्याची व्यवस्था केली असून निवडणुकीसाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील, त्या सर्व उपाययोजना प्रशासनाने केल्या असून माळशिरस तालुक्यातील प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, असेही प्रांताधिकारी पांगारकर यांनी सांगितले.

निवडणूक कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार तसेच माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. कल्याण हुलगे हे कार्य करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजीत पत्रकार परीषदेमध्ये प्रातांधिकारी विजया पांगारकर यांनी मतदार केंद्राच्या नावातील बदल, केंद्रांच्या स्थानातील बदल, मतदार संघातील नवीन केंद्र आणि प्रत्येक मतदान केंद्रावर समान मतदार संख्येसाठी विलीन मतदार केंद्रांची माहिती दिली.

नाव क्रमांक बदल – एकुण ६ मतदान केंद्र –
जाधववाडी – ११०
पानीव – १६८ (नवीन क्र. – १७०)
वेळापुर – २९६ (नवीन क्र.३०१)
तांदुळवाडी – ३२५, ३२६, ३२७ (नवीन क्र.३३१, ३३२, ३३३)
या तिन मतदान केंद्रांच्या स्थानात बदल –
देशमुखवाडी – ४
पठाणवस्ती (वाणीवाडी) – २०३ (नविन क्र.२०५)
दसुर – ३३४ (नविन क्र. – ३४०)

लोकसभा निवाडणुकीमध्ये असलेल्या ३३८ मतदान केंद्रामध्ये नवीन सात केंद्राची वाढ करण्यात आली.
नविन मतदान केंद्र – ७
माळशिरस १३७, १४२, मगरवाडी (गारवाड) २०७, सुळेवाडी – २१०,
अकलुज (दत्तनगर) – २७१, काळमवाडी – ३१५, उघडेवाडी – ३४५, ७७.

मतदान केंद्रांचे झाले विलनीकरण
मतदान केंद्रावरील मतदार संख्येत असणारी विषमता टाळण्यासाठी सरासरी १३५० ते १५०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र व्हावे, यासाठी ७७ मतदान केंद्रांचे विलनीकरण करण्यात आले.

विलिन मतदान केंद्राची संख्या व क्रमांक (जुने मतदान केंद्र क्रमांक) –
कुरबावी ६ व ७, डोंबाळवाडी ८ व ९, कारुंडे १७ व १८, एकशिव २८ व २९, नातेपुते ४७, ५२, ५३, ५४, ५८, ५९, ६०, फोंडशिरस ७०, ७१, ७२, ७५, ७७ फडतरी ८१ व ८२, मांडवे ८९ व ९०, सदाशिवनगर १०५ व १०६, तिरवंडी १२७ व १२९, माळशिरस १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४४, १४५, तरंगफळ १६४ व १६५, यशवंतनगर १८२ व १८५, सुळेवाडी २०५ व २०६, पिलिव २०७, २०९, २१०, २१२, पिसेवाडी २२३ व २२५, माळेवाडी अकलुज २३० व २३१, अकलुज, २८४, २४९, २५५, २६६, संग्रामनगर २६०, २६१, २६३, २६४, तांबवे २७७ व २७९, वेळापूर २९३, २९४, २९७, ३००, कोळेगाव ३१६, ३१७, ३१८, तांदुळवाडी ३२२ व ३२४, धानोरे ३२९ व ३३०, दसुर ३३३ व ३३४, उघडेवाडी ३३७ व ३३८.

कोणाचे मतदान नोंदणी करावयाची राहिली असल्यास त्यांनी १९ ऑक्टोबरपर्यंत मतदान नोंदणी बी. एल. ओ. तहसील ऑफिस किंवा ऑनलाईन करण्याचे आवाहन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले आहे. बरेच मतदार इतरत्र स्थायिक झाले असले कारणाने त्यांचे मतदान होत नाही. त्यासाठी त्यांना मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे यासाठीचे मेसेज करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली. आधार कार्ड नाही म्हणून मतदान करता येत नाही, असा गैरसमज दूर करा व आपल्याकडील कोणताही पुरावा मतदानासाठी चालू शकतो.
दहा मॉडेल केंद्राची उभारणी
चार महिला केंद्र – यशवंत नगर, माळीनगर, अकलूज, दत्तनगर (खंडाळी)
युथ केंद्र चार -भांब, जळभावी, सुळेवाडी
दिव्यांग केंद्र दोन – माळशिरस, बागेवाडी

या मॉडेल केंद्रांमध्ये इको फ्रेंडली सजावट, आकर्षता केली जाणार आहे. तसेच वेगवेगळ्या थीम वापरल्या जाणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

6 Comments

  1. Thinker Pedia You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!

Leave a Reply

Back to top button