एम.एस. ई.बी. अधिकारी चांगण चा मनमानी कारभार, वीज कनेक्शन तोडून अबालवृद्धांना नाहक त्रास…

साखरवाडी (बारामती झटका)
साखरवाडी येथील एमएसईबी अधिकारी चांगण यांनी मनमानी कारभार करत लाईनमन रमेश हळदे व इतर एमएसईबी कामगारामार्फत कसलीही पूर्व सूचना न देता काळज गावातील ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडून ऐन उन्हाळ्यात व परीक्षा चालू असताना अबालवृद्धांना नाहक त्रास देण्याचा मनमानी कारभार चालवला आहे. अशी तक्रार काळज गावातील वीज ग्राहक व ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्राहकांनी याची दाद न्यायालयात मागणार असल्याचे सांगितले आहे.
एमएसईबी मार्फत ग्राहकांना विज तोडण्यापूर्वी 15 दिवसांची लेखी सूचना देणे बंधनकारक असताना भारतीय विद्युत कायदा (IEA) 2003 च्या कलम 56 (1) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड साठी कनेक्शन तोडण्याच्या 15 दिवस आधी ग्राहकांना लेखी नोटीस बजावणे बंधनकारक आहे. हे कलम देशभरातील सर्व विद्युत पुरवठा कंपन्यांना लागू करण्यात आले आहे.
या कायद्याप्रमाणे काळज गावातील ग्रामस्थ अधिकारी चांगण व लाईनमन हळदे व इतर संबंधितांच्या विरोधात न्यायालयात लवकरच दाद मागणार आहेत. व संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राहकांची लवकरात लवकर माफी मागून ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांशी चर्चा करून वेळ द्यावा व तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडावे, अशी मागणी काळज ग्रामस्थांकडून केली जात आहे.
अन्यथा लवकरच या विरोधात साखरवाडी येथील एमएसईबी कार्यालयासमोर उपोषणास बसून संबंधितांविरोधात न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. तसेच लवकरच ज्या वीज ग्राहकांवर अन्याय झाला आहे ते सर्व ग्राहक या मनमानी कारभार करणाऱ्या अधिकारी, लाईनमन व इतर संबंधितांच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी करणार आहेत, असेही ग्रामस्थांनी सांगितले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.