मा. आ. राम सातपुते, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी घेतली केचे पाटील परिवार यांची सांत्वनपर भेट..

प्रगतशील बागायतदार स्वर्गीय तुकाराम ज्ञानोबा केचे पाटील यांच्या परिवारांची भेट घेतली…
लवंग (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. राम विठ्ठल सातपुते व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी 25/4 लवंग येथील केचे पाटील परिवार यांची सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक मानिक बापू मिसाळ, माळीनगर जिल्हा परिषदेचे लोकप्रिय युवा नेतृत्व सोनूभैय्या पराडे पाटील, यांच्यासह परिसरातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

लवंग गावचे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय तुकाराम ज्ञानोबा केचे पाटील यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ जयकुमार केचे पाटील यांचे वडील होते. त्यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले होते.
केचे पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. त्यांना दुःखातून सावरण्यासाठी मा. आ. राम सातपुते, युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन केचे पाटील परिवार यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



