मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा व गोरगरिबांचा कैवारी – एक फलटणकर

तीस वर्ष प्रस्थापित मंडळींनी लाल दिव्यापाई अस्मिता गहाण ठेवलेली आहे… तर अल्पावधीतच दादांचे नेतृत्व स्वाभिमानाने लोकप्रिय ठरलं…
फलटण (बारामती झटका)
अरे, राजकारणासाठी तुम्ही किती जण एका सिंहाच्या पाठीमागे वार करत लागलाय. अरे बाजार भुजग्यांनो ज्या नेतृत्वाचा स्वीकार जनतेने केला आहे त्याचं कारण तुम्हाला माहित आहे का?
राजकारण करून फलटण तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर बदनाम करणाऱ्या तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील बाजार भुजग्यांना मला सांगायच आहे, ज्या नेतृत्वाला तुम्ही त्या प्रकरणाशी काही संबंध नसताना तर राजकीय हेतू साधून त्यांचं नाव तुम्ही घेताय. त्याच सिंहाने म्हणजेच आमच्या रणजीतसिंह यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आणि इतरही भागात शाळेत चालत जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी २०,०००० सायकल मोफत वाटल्या आहेत. बांधकाम विभागाच्या माध्यमातून पंचवीस हजार लाभार्थ्यांना ती स्कीम मोफत मिळवून दिली आहे.

शेतकरी कष्टकरींच्या हक्काचं निरा देवघर चे पाणी जे पाणी तत्कालीन 30 वर्षे त्या सत्ताधारी मंडळींनी लाल दिव्यापाई गहाण ठेवलं होतं ते पाणी लाभ क्षेत्रात आणण्यासाठी हजारो कोटीचा निधी उपलब्ध करून ते काम प्रत्यक्षात पहिला टप्पा पूर्ण झाला आणि काल दुसरा टप्पा सुरू झाला. फलटण तालुका सुजलाम सुफलाम् होतोय. फलटणला जोडणारे इतर तालुक्यातून येणारे सगळे रस्ते काँक्रिटीकरण, डांबरीकरण करून रुंदीकरण केले.
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना एसटीची गैरसोय होत होती. जवळपास 20 नवीन बसेस शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या. गोरगरीब जनतेला दरवर्षी वीस पंचवीस हजार दिवाळीचे किट मोफत स्वखर्चातून वाटतात.

2011-12 च्या सिझनला फलटण तालुक्यामध्ये उसाचे प्रमाण जास्त होतं आणि त्यावेळेस अनेकांना त्याचा त्रास झाला आणि यामुळेच आपल्या शेतकऱ्यांच आपल्या फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांचा ऊस वेळेत जावा आणि उसाला सर्वाधिक भाव मिळावा हा उद्देश मनामध्ये ठेवून स्वराज उद्योग समूहाच्या माध्यमातून साखर कारखाना उभा केला. फलटण तालुक्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना हा स्वराज कारखाना आहे.
अनेक नेत्यांनी वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर आजपर्यंत उड्या मारल्या परंतु, आमचा हा सिंह कर्तुत्ववान निघाला. स्वतःच्या हिमतीवर स्वराज उद्योग समूहाची स्थापना करून फलटण तालुक्यातील लाखो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, अशा कर्तुत्ववान नेतृत्वाला फलटणच्या सुपुत्राला अडचणीत आणण्यासाठी अनेक पिसाळलेली कुत्री मागे लागले आहेत. परंतु, त्या पिसाळलेल्या कुत्र्यांना माहित नाही सिंहाने एकदा पाठीमागे पाहिलं तर एकाची धमक समोर येऊन बोलायची नाहीये. कारण, आता फलटण कोरेगाव मतदार संघातील जनता ही आदरणीय माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे.


विरोधकांनो, तुम्ही कितीही कांड करा, काही फरक पडणार नाही. कारण, आता जनता पूर्वीसारखी दूधखुळी नाही. आता जनता जनार्दन हुशार आहे, त्यांना सर्व समजत आहे. गेल्या चार दिवसापूर्वी असून जे पोपटपंची बोलत आहेत, जे पोपटपंची चुकीच्या पद्धतीने आमच्या आदरणीय दादांना टार्गेटच करत आहेत. त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे जनतेने आता ओळखलं आहे. आणि म्हणूनच काल झालेली सभा लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहिला. येणाऱ्या काळात सर्व निवडणुकांमध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली 100% सत्ता जनता जनार्दन देणार आहे आणि विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे.
जय हो दादा…
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरिबांचा कैवारी आदरणीय माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



