Uncategorized

मा. खा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. श्री. सचिन पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली येत्या काही दिवसात फलटण ची बारामती झाल्याशिवाय रहाणार नाही – गटनेते अशोकराव जाधव

फलटण (बारामती झटका)

फलटण शहरातील विकास मा. खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली कधी नव्हे एवढा चालू आहे. साहजिक आहे जेव्हा डेव्हलपमेंट चालु असते तेव्हा थोडा त्रास सहन करावाच लागतो पण, विरोधकांना आयते कोलीत घेऊन नाचायची सवय झाली आहे.

गेल्या अडीच ते तीन वर्षांत कोट्यावधी रुपयांचा निधी फलटण शहर व तालुक्यात आणण्यात रणजितदादा यशस्वी झाले आहेत. त्याची कामे चालू आहेत. नगर परिषदे शेजारी भव्य दिव्य आणि देखणे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे रहात आहे. त्याचे खोदकामाची माती रस्त्यावर सांडणार नाही तर ती कुठे सांडणार, पण त्याचा बाउ करून लगेच बोंबाबोंब चालू झाली आहे.

प्रत्यक्षात शॉपिंग कॉम्प्लेक्स, अद्यावत महिला जिम, स्विमिंग पूल, स्टेडियम, तारांगण, पालखी रोड, रिंग रोड चे सुशोभीकरण, फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन चे इमारती, नवीन प्रशासकीय भवन, नविन जिल्हा न्यायालयाची इमारत, नविन वारकरी भवन अशी अनेक कामे मा. खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून चालू आहेत. ती कामे फलटण शहराचा चेहरा मोहरा बदलणारी असणार आहेत.
त्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठलेला आहे.

थोडे थांबा, फलटण शहराची नविन ओळख निर्माण होत आहे. त्यात सर्व फलटणकर नागरिकांनी मा. खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button