ताज्या बातम्याराजकारण

मा. नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख मित्रपरिवार व माळशिरस शहर भाजपच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन….

पालकमंत्री जयकुमार गोरे आ. गोपीचंद पडळकर, आ. सचिन पाटील यांचा सन्मान मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व मा. आ. राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पुणे-पंढरपूर रोड, माळशिरस शहर पोलीस स्टेशन शेजारील शहा धाराशी जीवन प्लॉट माळशिरस येथे संपन्न होणार आहे. सदर भव्य सत्कार समारंभाचे आयोजन भारतीय जनता पार्टी चे विशेष निमंत्रित प्रांतीक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख मित्रपरिवार व माळशिरस शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आ. सचिन पाटील, मा. आ. राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत माळशिरस नगरपंचायत मधील विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा व भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस शहर शाखेचे उद्घाटन संपन्न होणार आहे. लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर भव्य नागरी सत्काराचे आयोजन केलेले आहे.

तरी सदरच्या कार्यक्रमास महायुतीच्या सर्व घटक पक्ष व संघटना यांनी उपस्थित रहावे असे डॉ. आप्पासाहेब देशमुख मित्र परिवार व भारतीय जनता पक्ष माळशिरस शहर यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button