शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने गुणवंत आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

खा. धैर्यशील मोहिते पाटील व आ. उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस, येथे शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य शाखा माळशिरस आयोजित गुणवंत आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १०/०४/२०२५ रोजी सकाळी ११ वा. अन्नपूर्णा संस्कृतिक भवन धवलनगर, अकलूज येथे करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर तर विशेष अतिथी म्हणून राजाध्यक्ष संतोषजी पिट्टलवाड हे उपस्थित असणार आहेत.
तसेच यावेळी कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, कादर शेख शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर, डॉ. आबासाहेब पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस, जितेंद्र साळुंखे प्राचार्य डी. आय. इ. टी. वेळापूर, प्रदीपकुमार करडे गटशिक्षण अधिकारी माळशिरस, सुषमा महामुनी शिक्षण विस्तार अधिकारी माळशिरस, सुभाष बुवा अधिव्याख्याता डी. आय. इ. टी. वेळापूर, विठ्ठल टेळे राज्य संघटक, निलेश देशमुख राज्य सरचिटणीस, संजय दवले पुणे विभाग सरचिटणीस आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
तर रविराज खडाखडे जिल्हाध्यक्ष, सुवर्णा गाडे अध्यक्षा महिला आघाडी, रवींद्र जेटगी जिल्हा उपाध्यक्ष, सचिन निरगिडे सरचिटणीस, आबासाहेब तरंगे जिल्हा कार्याध्यक्ष, सुनील पवार जिल्हा संघटक, नेहरू राठोड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, सुमंत मुंडे जिल्हा संपर्कप्रमुख, सुनील फुंदे सह सरचिटणीस संयोजन तालुका प्रतिनिधी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी या पुरस्कार सोहळ्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मार्गदर्शक दीपक परचंडे राज्यकार्याध्यक्ष, नागनाथ बळवंतराव तालुका अध्यक्ष, बाळासाहेब लोखंडे तालुका कार्यकारी अध्यक्ष, केशव अभंगराव तालुका उपाध्यक्ष, नितीन गाडे तालुका सरचिटणीस, गणेश देशमुख तालुका नेते, ज्ञानेश्वर सर्जे तालुका कार्याध्यक्ष, सुबोध काटे व सतीश बरळ तालुका सहकार्याध्यक्ष, माणिक करडे तालुका कोषाध्यक्ष, सचिन वलेकर तालुका संपर्कप्रमुख, सोमनाथ कांबळे तालुका संघटक, सूर्यकांत जाधव व दादासाहेब भोसले तालुका प्रसिद्धीप्रमुख तसेच शिक्षक सहकार संघटना माळशिरस व महिला आघाडी माळशिरस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.