ताज्या बातम्यासामाजिक

मा. श्री. रणजितसिंहभैय्या शिंदे मित्र मंडळाच्या व सकल मराठा समाज माढा तालुक्याच्यावतीने सोलापूर येथे एक लाख मराठा बांधवांसाठी अल्पोपहाराची सोय .

कन्हेरगांव (बारामती झटका)

आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ, निमगांव (टें.), ता. माढा, सकल मराठा समाज, माढा तालुका व रणजितसिंहभैय्या शिंदे मित्र मंडळ माढा तालुका यांच्यावतीने सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी आलेल्या मराठा समाज बांधवांसाठी छत्रपती संभाजीमहाराज चौक, पुणे नाका, सोलापूर येथे अल्पोपहाराची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी सुमारे 200 मराठा स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

उद्या बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीसाठी १२ वाजता सोलापूर येथे येणार आहेत. या रॅलीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सोलापूर येथे गर्दी करणार आहेत. त्या ठिकाणी संबंध जिल्ह्यातून येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या सोयीसाठी जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा. श्री. रणजितसिंहभैय्या शिंदे मित्र मंडळाच्यावतीने सुमारे १ लाख समाज बांधवांच्या अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे.

त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक, पुणे नाका, सोलापूर येथे १२० फुटाचा मंडप टाकला असून, त्या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या अल्पोपहाराची व पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी २०० स्वयंसेवक बांधव परिश्रम घेत आहेत.

यावेळी आमदार मा. श्री. बबनराव शिंदे, आमदार मा. श्री. संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन मा. श्री. रणजितसिंहभैया शिंदे हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार असून येणाऱ्या मराठा समाज बांधवांचे स्वागत करणार आहेत. अशी माहिती त्या ठिकाणी उपस्थित असलेले गोरख देशमुख सर, तुकाराम उर्फ बंडूनाना ढवळे पाटील, विजय दादा खटके पाटील, पांडुरंग तात्या ढवळे पाटील, गणेश व्यवहारे, सचिन पवार, अनिल पाटील यांनी दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button