“माढा आणि पाडा”, मोहिते पाटील समर्थकांचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजपचे कमळ चिन्हाला आव्हान…
फाजील व अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे “खाया पिया कुछ नही, गिलास फोडा बाराआणे” अशी राजकीय अवस्था मोहिते पाटील यांची होईल ?
माळशिरस (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्यासाठी भारतीय जनता पक्ष व घटक पक्ष कामाला लागलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजत आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जास्तीत जास्त लोकसभेचे खासदार निवडून येतील याची दक्षता घेतली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून २० उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरच्या यादीमध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस आणि भारतीय जनता पक्षाच्या निवड समितीने उमेदवारी दिलेली आहे.
माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांनी “माढा आणि पाडा”, अशा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजपचे कमळ चिन्हाला आव्हान दिलेले आहे. मोहिते पाटील यांचे फाजील व अतिउत्साही कार्यकर्त्यांची समाजामध्ये एक म्हण प्रचलित आहे “खाया पिया कुछ नही, गिलास फोडा बाराआणे”, अशी राजकीय अवस्था मोहिते पाटील यांची होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये कोणताही उमेदवार हा कमळाचाच असतो. त्यामुळे भाजपमधील नाराज असो अथवा आनंदित असो, पक्षविरोधी भूमिका घेतली जात नाही. मात्र, भारतीय जनता पक्षामध्ये नव्याने प्रवेश केलेले मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक यांना अजून भारतीय जनता पक्ष व पक्षाची ध्येय धोरणे समजलेलीच नाहीत. मोहिते पाटील यांनी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्षीय प्रवास करून देवेंद्रजी फडवणीस यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील यांना सहकारी संस्थांना मदत केलेली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना कोट्यावधी रुपये खर्चून विधान परिषदेची बिनविरोध उमेदवारी देऊन आमदार केलेले आहे. मोहिते पाटील यांच्या शिफारशीनुसार माळशिरस तालुक्यात अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, वॉरियर्स यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे लागू होत असतात, तरीसुद्धा मोहिते पाटील समर्थक वाचाळवीर पक्षाच्या विरोधी अपप्रचार करीत आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पक्ष बोलत नाही मात्र, कृती करीत असतो याचे भान मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थकांना नाही, अशी विरोधी पक्षातून सुद्धा चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस हे मोहिते पाटील यांचे एकमेव राजकीय श्वास आहेत. फाजील कार्यकर्त्यांमुळे मोहिते पाटील यांचा राजकीय श्वास बंद होईल, असेही भाजपच्या निष्ठावान गोटामधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
how to get ventolin over the counter: Buy Albuterol inhaler online – ventolin rx
how much is a ventolin
ventolin nebules: ventolin order – ventolin 2.5 mg
price of neurontin: neurontin cap – neurontin cost generic
recommended canadian pharmacies: Online medication home delivery – ordering drugs from canada
canadian drug prices: Cheapest online pharmacy – the canadian pharmacy
Ищите в гугле