Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

माढा जिंकलाय, पैजा लावा आणि पैसे कमवा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील.

माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना माढ्याचा निकाल ठामपणे सांगितला.

पुणे (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे येथे माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी यांना बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठामपणे सांगितला. माढा आपण जिंकलाय, पैजा लावा आणि पैसे कमवा असे कार्यकर्त्यांन चर्चेच्या वेळी फर्मान काढले आहे.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ उर्फ अण्णा यांच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी शालेय शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार परमनंट खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रचाराची सांगता सभा संपल्यानंतर माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी यांनी भेट घेतली. त्यावेळेस सोलापूर लोकसभेसह माढा सुद्धा जिंकलाय असे ठामपणे सांगून पैजा लावा आणि पैसे कमवा असे, माढा मतदार संघातील कार्यकर्त्यांना फर्मान काढलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button