माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचाच प्रचार करुन त्यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा – सोमनाथ भोसले, जिल्हा अध्यक्ष
माढा (बारामती झटका) बी. टी. शिवशरण ज्येष्ठ पत्रकार
माढा लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना-आरपीआय-मनसे युतीचे अधीकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करुन त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी केले आहे.
आरपीआय आठवले गट भाजप सोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटले होते की, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपर्क साधल्याशिवाय त्यांचा माढा लोकसभा मतदारसंघात प्रचार करणार नाही. तेव्हा आज सोमनाथ भोसले यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आरपीआय आठवले गट भाजप सोबत राहणार आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करुन त्यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागावे.
ते पुढे असेही म्हणाले कि, उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपर्क साधला आहे. आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप-शिवसेना-मनसे -रासप बरोबर युती केली आहे. आठवले यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघात नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना निवडून आणावे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very informative article! I appreciate the depth of analysis. If you want to delve deeper, here’s a helpful resource: EXPLORE FURTHER. Eager to hear everyone’s thoughts!
This article really resonated with me. The points made were compelling. Id love to hear more opinions. Check out my profile for more!