माढा लोकसभा व विधानसभेत दोन रणजीतसिंहासाठी महाळुंगकरांनी कंबर कसली आहे.

माढा विधानसभेचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या वडीलकिच्या मार्गदर्शनाखाली नेते व कार्यकर्ते यांनी लंगोट आवळली..
महाळुंग (बारामती झटका)
माढा विधानसभा मतदार संघात माळशिरस तालुक्यातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीसह 14 गावांचा समावेश मतदार संघात आहे. माढा विधानसभेचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या वडीलकीच्या मार्गदर्शनाखाली नेते व कार्यकर्ते यांनी लंगोट आवळलेली आहे. माढा लोकसभा निवडणुकीत विद्यमान पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेत व माढा विधानसभेत सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य युवा नेते रणजीतसिंह शिंदे यांना विधानसभेत अशा दोन रणजीतसिंहांसाठी महाळुंगकरांनी कंबर कसलेली आहे.
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात माढा विधानसभेत आणलेले ग्रामदैवत यमाई देवीच्या मुळे 14 गावाचे नाक महाळुंग-श्रीपुर आहे. महाळुंगकरांच्या भूमिकेवरच आसपासच्या गावातील गणिताची गोळाबेरीज होत असते. महाळुंगकरांनी दोन रणजीतसिंहांसाठी लंगोट लावून विजयासाठी कंबर कसलेली आहे. यासाठी सुद्धा ग्रामदैवत यमाई देवीच्या जीर्णोध्दारामध्ये मोठं योगदान आहे.
माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी वेळोवेळी यमाई देवीच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केलेले होते. मात्र, पुरातत्व खात्याची अडचण येत होती. अशा अडचणीच्या काळात अनेक दादा येऊन यमाई देवीची झालेली पडझड पाहून दौरा करीत होते. मात्र यमाई देवीच्या जीर्णोध्दारासाठी प्रयत्न केलेला नव्हता. माढा लोकसभेसाठी कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीचे पदाधिकारी व संबंधित विभागाचे केंद्रीय मंत्री व अधिकारी यांच्या समवेत बैठका घेऊन रखडलेला यमाई देवीचा जीर्णोद्धाराचा प्रश्न सोडविलेला आहे. त्यामुळे महाळुंग-श्रीपुर पंचक्रोशीसह आसपासच्या गावातील यमाई देवी भक्तांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
माढा विधानसभेचे षटकार पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगकर व यमाई देवीच्या भक्तांमधून माढा लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभेसाठी युवा नेते रणजीतसिंह शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून पुनश्च रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे तर रणजीतसिंह शिंदे यांना मुंबईला आमदार म्हणून पाठवायचे, असा निर्धार महाळुंगकरांनी करून लंगोट आवळून कामाला लागले असून विजयासाठी कंबर कसलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.