माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेतले.
वेळापूर (बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी वेळापूरचे ग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान असणारे महादेवाच्या मंदिरातील अर्धनारी नटेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ग्रामदैवत शंभू महादेवाच्या नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. रविवारी धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजन होते. सोमवारी अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेतले. मंगळवारी दीपावली पाडवा आहे. दिवाळीतील दोन्ही दिवसाच्यामध्ये सोमवार महादेवाचा वार आलेला होता, याच दिवशी अर्धनारी नटेश्वराचे मनोभावे दर्शन घेत असताना यशस्वी असा कौल मिळालेला आहे. यावेळी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळत होता.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Very well-written and funny! For more information, visit: DISCOVER HERE. Looking forward to everyone’s opinions!