ताज्या बातम्याराजकारण

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मांडवे गावचे युवा नेते अमोल शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व मांडवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य युवा नेते विठ्ठल पालवे यांच्यात राजकीय गुप्त चर्चा, दिला कानमंत्र.

मांडवे (बारामती झटका)

माढा लोकसभेचे लोकप्रिय कार्यतत्पर पाणीदार खासदार श्री. रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातील मांडवे गावातील शिंदे वस्ती या ठिकाणी युवा नेते अमोल शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मांडवे गावचे माजी सरपंच हनुमंत टेळे, उपसरपंच राजेंद्र शिंदे, सदस्य सहदेव खोमणे, ग्रामपंचायत सदस्य युवा नेते संघर्षनायक विठ्ठल पालवे, युवा नेते अमोल शिंदे, युवा नेते महादेव वाघमोडे, पांडुरंग शिंदे, संजय पालवे, तुकाराम शेंडगे, रामा माने, भगवान शिंदे, चंदू शिंदे, पिनू चोपडे, मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे पत्रकार स्वप्निलकुमार राऊत व मांडवे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जंगी स्वागत करून युवा नेते अमोल शिंदे परिवारांच्यावतीने सन्मान करण्यात आला. मांडवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य युवा नेते संघर्षनायक विठ्ठल पालवे यांना कानमंत्र देऊन राजकीय गुप्त चर्चा करण्यात आली. मांडवे गावामध्ये राजकीय वातावरण वेगवेगळ्या पद्धतीने ढवळून निघत असताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या भेटीने अनेक समीकरणे बदलणार आहेत. मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात फलटणच्या सिंहाच्या आगमनाने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button