माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातील शिवनेरी दहिहंडी, पिलीव उपस्थित राहण्याचे निमंत्रण….
शिवनेरी दहीहंडी महोत्सव पिलीव २०२३ शिवराज पुकळे युवाशक्ती यांच्या वतीने संपन्न होणार आहे.
पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात शिवनेरी दहीहंडी उत्सव पिलीव २०२३ शिवराज पुकळे युवाशक्ती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना विशेष उपस्थित राहण्याचे निमंत्रण संयोजन समितीच्या वतीने देण्यात आलेले आहे.
शिवनेरी दहीहंडी उत्सव १० सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता आर्वे मैदान, बचेरी रोड, पिलीव येथे श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव यांच्या मार्गदर्शनाखाली व आयकर उपायुक्त आय आर एस डॉक्टर सचिन मोटे यांची प्रमुख उपस्थिती तर खास प्रमुख आकर्षण चंदा फ्रेम बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम सुमन यांची उपस्थिती राहणार आहे.
शिवनेरी दहीहंडी उत्सवामध्ये पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये फलटण-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकरी नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, उद्योजक विनायक शेठ मासाळ व उद्योजक दादाशेठ कचरे यांच्या वतीने आहे. आकर्षक बक्षीस ७५ हजार रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर व जनसेवा समूहाचे अण्णासाहेब सुळ यांच्या वतीने आहेत.
दुष्काळग्रस्तांना मदत ५२ हजार रुपये संतोष शेठ पडळकर, पिसेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार, महावीर दादा व अमोल दादा ग्रुप यांच्या वतीने आहे. सदरच्या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक शिंगोर्णीचे सरपंच अक्षयभाऊ धांडोरे, काळमवाडीचे सरपंच भुजंगराव शिंगाडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बचेरी बिराबाई शिंदे, कुसमुडचे सरपंच महावीर धायगुडे, जितेंद्र उर्फ छोटू पाटील, पिलीव ग्रामपंचायत सदस्य जीवनदादा गुरव, दादासाहेब वगरे, बचेरीचे सरपंच विश्वजीत गोरड, पिलीव विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन महादेव सुळे, जय मल्हार हॉटेल साळमुख प्रोप्रायटर विकासदादा कोकरे, यांच्यावतीने आहे.
माणदेशी निवेदक लखनराज खांडेकर दहीहंडीचे समालोचन करणार आहेत. सदरचा कार्यक्रम बारामती झटका, शिवारनामा व मानदेश प्राईम या चॅनलवर पाहता येणार आहे.
तरी सर्व दहीहंडी शौकीन यांनी मंगेश वाघमारे 9421072504, अक्षयभाऊ वगरे 8888042506, खंडूनाना माने 8208881937, गणेश घुले 9604750357, अमोल मदने 7020594380, अजय खुर्द 8806136266, सागर मेटकरी 7020707054, सुमित भाऊ मोरे 9307350073, गणेश लेंगरे 9082593574, राहुल लोखंडे 7517311992, गणेश देशमुख 8888968858, वाल्मीक सुरवसे 9168531820 यांच्याशी संपर्क साधावा असे शिवराज पुकळे युवाशक्ती यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng