माढा लोकसभेच्या निवडणुकीत पौर्णिमेला बिघडलेले अमावस्येला स्थिरावले, तुतारी म्हणणारे कमळाकडे वळले…
देशाचे पंतप्रधान विकासरत्न नरेंद्रजी मोदी यांच्या ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, या गजराने गढूळ वातावरण निवाळले…
माळशिरस (बारामती झटका)
देशाच्या 19 व्या लोकसभेच्या निवडणुकीत देशात व राज्यात बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभा मतदार संघात नाट्यमयरित्या राजकीय वातावरण बदललेले आहे. विज्ञान युगात भारतीय संस्कृती व अध्यात्माची प्रचिती आलेली आहे. माढा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 20 एप्रिल पासून सुरुवात होती.
मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खऱ्या अर्थाने 22 व 23 एप्रिल रोजी रंगत आली आणि विशेष म्हणजे माढा लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण उमेदवारी अर्ज भरीत असताना इतके भयानक बिघडलेले होते. त्याला राजकीय पार्श्वभूमी बरोबर दोन दिवस पौर्णिमा असल्याने सुद्धा अनेकजण बिघडलेले असतात, तशीच अवस्था माढा लोकसभा मतदारसंघात झालेली होती. मात्र मतदान 07 मे रोजी होते आणि त्याच दरम्यान अमावस्या 07 व 08 मे रोजी होती. त्यामुळे पौर्णिमेला बिघडलेले अनेकजण अमावस्येला स्थिरावले. तुतारी म्हणणारे कमळाकडे वळले याला देशाचे पंतप्रधान विकासरत्न नरेंद्रजी मोदी यांच्या ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ याचा गजर माळशिरस येथील विजयी संकल्प सभेत केल्याने गढूळ वातावरण निवाळले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
माढा लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरीत असताना माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील पारंपारिक विरोधी गट एकत्र आलेले होते. महायुतीमध्ये असणारे शिवसेनेचे शिवाजीराव सावंत, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते यांनी वेगळी भूमिका घेतलेली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करून छाननी होऊन प्रचाराचा शुभारंभ झाला तरीसुद्धा वातावरण माढा लोकसभा मतदारसंघात दूषित केलेले होते. 28 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अकलूज येथे प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी व्यासपीठावरून भाषण केल्यानंतर माळशिरस तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघात वातावरण बदलण्यास सुरुवात झाली.
देशाचे पंतप्रधान विकासरत्न नरेंद्रजी मोदी यांच्या माळशिरस येथे विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरच्या सभेत डोक्यावर पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी घेऊन येळकोट येळकोट जय मल्हार, बाळूमामाच्या नावानं चांगभलं याचा गजर केल्याने गढूळ वातावरण निवळले आणि खऱ्या अर्थाने माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या विजयाची घोडदौड सुरू झाली.
महायुतीतील बंडोबा सुतासारखे सरळ झाले. कितीतरी नेते घराच्या बाहेर पडलेले नाहीत. माढा लोकसभा मतदार संघातील आमदार दीपक चव्हाण फलटण वगळता आमदार बबनदादा शिंदे माढा, आमदार शहाजीबापू पाटील सांगोला, आमदार जयकुमार गोरे मान खटाव, आमदार संजयमामा शिंदे करमाळा, आमदार राम सातपुते माळशिरस या पाच लोकप्रतिनिधींनी पाच पांडवांची भूमिका निभावली. त्यांना माजी आमदार प्रशांतमालक परिचारक, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार जयवंतराव जगताप, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, रश्मीताई बागल, कल्याणराव काळे, अभिजीत पाटील, माळशिरस तालुका विकास आघाडी यांच्यासह भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रयत क्रांती शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट, यांच्यासह अनेक महायुतीतील घटक पक्षांचे सहकार्य लाभलेले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माळशिरस येथील सभेनंतर माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण निवळलेले होते. तरीसुद्धा अनेक कार्यकर्ते व नेते यांनी तुतारीचे छातीवर बिल्ला व मोबाईलवर स्टेटस ठेवलेला होता. कारण मोहिते पाटील व मोहिते पाटील पारंपारिक विरोधक एकत्र झालेले असल्याने कोणाचे वाईट होतं, असा निर्णय काही कार्यकर्त्यांनी घेतलेला होता. असे खाजगीत एकमेकांना बोलत होते. माळशिरस तालुक्यात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना 30,000 मते पडतील असा अंदाज व्यक्त करणारे जीभ दाताखाली धरून 70 ते 80 हजाराकडे मतदान होईल असा अंदाज व्यक्त करीत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात तुतारी अडीच लाखाने निवडून येईल म्हणणारे 10 हजाराने तरी येईल असे उसने अवसान आणून म्हणत आहेत. मात्र, महायुतीच्या घटक पक्षातील नेतेच नव्हे तर साधा कार्यकर्ता सुद्धा छातीठोकपणे सांगतोय माढा लोकसभा मतदारसंघात कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व माढा लोकसभेच्या निवडणुकीत पौर्णिमेला बिघडलेले अमावस्येला स्थिरावलेले तुतारी म्हणणारे कमळाकडे वळले अशी अवस्था झालेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I like this web site very much, Its a really nice berth to read and
incur information.Blog range