माढा तालुक्याची अस्मिता व स्वाभिमान खंबीर ठेवून बाहेरील धुर्त शक्तीचे आक्रमण रोखण्यासाठी मताधिक्य द्यावे – रणजीत शिंदे
माढा (बारामती झटका)
माढा तालुक्याची अस्मिता आणि स्वाभिमान भक्कम ठेवण्यासाठी आणि या तालुक्यावर दुष्ट, धूर्त आणि लबाड शक्तीचे अतिक्रमण रोखण्यासाठी व या तालुक्यात सुख, समाधान आणि वैभव निर्माण झालेले, सध्याच्या काळातील अस्तित्व उध्वस्त करण्यासाठी टपलेल्या बाहेरच्या पोकळ, खोटारडा मोठेपणा दाखवणाऱ्या दडपशाही शक्तीला रोखण्यासाठी आपला एकसंघपणा दाखवून या निवडणुकीमध्ये निक्रमी मताधिक्य द्यावे, असे आव्हान माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांनी लऊळ येथील जाहीर सभेत बोलताना केले. ते पुढे म्हणाले की, वीस वर्षांच्या सीना-माढा सिंचन योजनेचे पुनर्जीवित करण्याची आता वेळ आली आहे. यासाठी ३०० कोटीचा प्रस्ताव दादांनी यापूर्वीच शासनाकडे पाठवलेला आहे. यामुळे या योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेखाली तालुक्यातील ५५ हजार क्षेत्र ओलिताखाली येत असून वेळेवर चालू झालेली व व्यवस्थित चाललेली महाराष्ट्रातील ही एकमेव सिंचन संस्था आहे. यापुढे मानेगाव उपसा सिंचन योजना तयार होऊन या तालुक्यातील ९० ते९५ टक्के क्षेत्र बागायती होणार आहे व संपूर्ण तालुक्याचा कायापालट होणार आहे. याचबरोबर दादा सर्वांना बरोबर घेऊन पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे व माळशिरस तालुक्यातील १४ गावे यांच्या सुद्धा तेथील गरजा ओळखून कोट्यावधी रुपयांचा निधी मोठ्या प्रमाणावर दिलेला असल्यामुळे आज सर्व स्तरातून माझ्या उमेदवारीचे समर्थन होऊन मला भक्कम पाठिंबा मिळत आहे. या पुढे देखील निरंतर विकासाचा प्रवाह भविष्यकाळात कायम चालूच राहणार आहे, याची मी विश्वासाने हमी देतो.
तालुक्याचा कायापालट करून इतिहास घडवला – आ. बबनदादा शिंदे
याप्रसंगी आ. बबनदादा शिंदे म्हणाले की, मी या तालुक्यांमध्ये धवल क्रांती, हरितक्रांती, कृषी औद्योगिक क्रांती, साखर कारखानदारी, सिंचन योजना, एमआयडीसी, विजेची सबस्टेशन्स, रस्ते, शैक्षणिक व आरोग्य सुविधा इत्यादी प्रकारच्या सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे मी या तालुक्यात एक इतिहास घडवला आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. व यामुळेच जनतेने जाणीव ठेवून त्यांच्याकडून मिळत असलेले प्रेम आज या विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता किंवा खोट्या प्रचाराच्या आहारी न जाता रणजीत शिंदे यांच्या सफरचंद चित्रापुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आव्हान दादांनी यावेळी पुन्हा केले.
तालुक्याची अस्मिता व स्वाभिमान टिकवण्यासाठी पाठिंबा दिला – शिवाजी सावंत
याप्रसंगी जिल्हा शिवसेनेचे प्रमुख प्रा. शिवाजी सावंत म्हणाले की, आपण देशाचा स्वाभिमान बाळगतो त्याप्रमाणे तालुक्याचा स्वाभिमान बाळगा. मी तीस वर्षे दादांचा विरोधक होतो. परंतु, आमचे वैचारिक व राजकीय मतभेद होते. परंतु, आमच्यात वैयक्तिक मतभेद कधी झाले नाहीत व म्हणून तालुका एकसंघ ठेवण्यासाठी व बाहेरील शक्तीला वाकड्या नजरेने पाहू न देण्यासाठी मी व माझ्या हजारो कार्यकर्त्यांनी रणजीत शिंदे च्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रणजीत शिंदे यांचा विजय झालेला आहे, ते आमदार झालेले आहेत. तुम्ही काळजीपूर्वक मतदान करा व २३ तारखेला गुलाल तयार ठेवा.
याप्रसंगी शिवाजी कांबळे, संजय पाटील, भिमा नगरकर, प्रताप नलवडे, राजेंद्र भोंग, दत्ताभाऊ म्हस्के, प्रकाश नवगिरे, परमेश्वर हळवनकर आदी मान्यवरांनी आपले प्रभावी विचार व्यक्त केले व रणजीत शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रहार संघटना, शेतकरी संघटना, लऊळ वडार संघटना, शिवसेना उबाठा संघटना तसेच ओबीसी संघटना व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देऊन रणजीत बबनराव शिंदे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी आम्ही निकराने प्रयत्न करू, असे आश्वासित केले. आमदार बबनदादा शिंदे यांनी पुष्पहार घालून सर्वांचे स्वागत केले.
याप्रसंगी नितीन बागल, मौलाचाचा पठाण, शंभू मोरे, संतोष अनभुले, पप्पू भोंग, प्रभाकर भोंग, सुरेश बागल, खंडूआप्पा नलवडे, दत्ता मस्के, बापू गरड, सरपंच पवन भोंग, भारत नलवडे, दिगंबर माळी, पंडितराव साळुंखे, सिद्धेश्वर घुगे, मारुती चव्हाण, स्वप्निल जानराव, रमेश पाटील, रसूल पठाण, बाबाराजे जगताप, तुकाराम शिरतोडे, वसंत नलावडे यांचे सह लवूळ परिसरातील दहा ते बारा खेड्यातील हजारो नागरिक प्रचार सभेला उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.