माढा व महाळुंग-श्रीपुर या दोन नगरपंचायतींच्या विविध विकास कामांसाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर
माढा (बारामती झटका)
दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन स्तरावरून झालेल्या निर्णयानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधांची कामे करणे या विशिष्ट योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माढा नगर पंचायत ता. माढा व महाळुंग- श्रीपुर नगरपंचायत ता. माळशिरस हद्दीतील विविध विकास कामांसाठी १५ कोटी रुपये निधी थेट शासन स्तरावरून मंजूर झालेला असून शासन निर्णयानुसार या कामाला संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा यांनी तांत्रिक मान्यता व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची कार्यवाही करावी असे नमूद करण्यात आले आहे.
वृत्तांत असा की, माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा नगरपंचायत ता. माढा व महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत तालुका माळशिरस येथील नागरिक व स्थानिक पदाधिकारी यांनी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे यांचे कडे स्थानिक पातळीवरील अडचणी व त्या ठिकाणांची कामे व्हावीत अशी आग्रही मागणी केलेली होती, त्यानुसार या दोन्ही ठिकाणच्या स्थानिकांच्या सर्व मागण्यांविषयी आमदार बबनदादा शिंदे यांनी शासन स्तरावर सर्वकामांना शासकीय मान्यता मिळवण्यासाठी संबंधित मंत्री महोदय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न केले होते व त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यानुसार १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या आदेश प्रति विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा नियोजन अधिकारी सोलापूर, माननीय उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) महोदयांचे उपसचिव व इतर संबंधितांना पाठवलेल्या आहेत .
माढा व महाळूंग-श्रीपुर या दोन्ही नगर पंचायतीमधील कामाचे स्वरूप व मंजूर निधी याप्रमाणे…..
माढा नगरपंचायत ता. माढा
१) प्रभाग एक मधील लिंगायत स्मशान भूमि ते चौरे शेत रस्ता काँक्रीट करणे व पूल बांधणे (४५ लाख) २) प्रभाग ११ मधील बोअर, मोटार, पाईपलाईन व टाकी किंवा हौद बांधणे (१५ लाख), ३) प्रभाग ११ मधील विठ्ठल मंदिर (शुक्रवार पेठ) येथे भक्तनिवास बांधणे (२० लाख), ४) भांगे वस्ती येथील जुना उंदरगाव रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे (६० लाख), ५) प्रभाग सहा मधील महादेव मंदिर परिसर सुशोभीकरण करणे (२० लाख), ६) प्रभाग सहामधील खंडोबा मंदिर समोर सभा मंडप बांधणे (१५ लाख), ७) प्रभाग सात मधील विठ्ठल मंदिर (मंगळवार पेठ) सुशोभीकरण करणे (30 लाख), ८) माढा- वैराग रोड ते माढा स्टेशनपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (25 लाख), ९) प्रभाग ९ मधील माढा शेटफळ रस्ता ते श्रीकांत जमदाडे घर इनलाईन गटार, पाणीपुरवठा लाईन काँक्रीट रस्ता करणे (१५ लाख), १०) प्रभाग नऊ मधील काळा मारुती मंदिर सुशोभीकरण करणेज्ञ(५० लाख), ११) प्रभाग क्रमांक १० मधील वसंत जाधव घर ते चिंचोली रस्तापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण करणे (४० लाख), १२) माढा शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सोलर हायमास्ट दिवे बसवणे (३० लाख), १३) माढा जाधववाडी रस्ता ते गोटे वस्ती स्ट्रीट लाईन बसवणे (२५ लाख), १४) प्रभाग क्रमांक १५ मधील सूतगिरणी रोड ते औदुंबर चौरे घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे (१० लाख) १५) माढा शहर पाणीपुरवठा योजना पैकी वडाचीवाडी फिल्टर हाऊस ते माढा शहर पाणीपुरवठा पाईपलाईन बदलणे (१०० लाख रु.).
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत –
१) प्रभाग एक व दोन मधील भाटगर कॅनॉल ते पोपट पवार घरा पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (६५ लाख), २) प्रभाग दोन मधील महाळुंग गट-२ रस्ता ते पप्पू चव्हाण घर एन एच-६५ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (७० लाख) ३) प्रभाग दोन मधील शिंदे वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे (२८ लाख) ४) प्रभाग २ मधील हनुमंत लाटे घर ते गुरुकृपा मंगल कार्यालय भुयारी गटार करणे (५ लाख), ५) प्रभाग क्रमांक ४ मधील मायनर ते स्टोरापर्यंत पाच रस्ता चौकापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (६० लाख), ६) प्रभाग क्रमांक ५ मधील मायनर अंतर्गत काँक्रीट रस्ता करणे (२० लाख), ७) प्रभाग क्रमांक ४ मधील तुळजाभवानी मंदिरासमोर पेविंग ब्लॉक बसवणे (५ लाख), ८) प्रभाग क्रमांक ६ मधील एन् एच् ६५ ते मुरलीधर लाटे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (२५ लाख), ९) प्रभाग क्रमांक ९ मधील हाके वस्ती ते चांगदेव मूंडफुणे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (३५ लाख), १०) प्रभाग क्रमांक १० मधील महाळूंग वेळापूर रस्ता ते हेमंत मिसाळ घर व भाऊसाहेब हाके घरापर्यंत खडीकरण डांबरीकरण करणे (३५ लाख), ११) प्रभाग क्रमांक ११ मधील बाबर दुकान ते शासकीय दवाखाना रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (३४ लाख), १२) प्रभाग क्रमांक ११ मधील प्रेमनाथ लांडगे घर ते मुलाणी घर रस्ता काँक्रीट करणे (५ लाख), १३) प्रभाग क्रमांक ११ मधील अरुण पवार घर गाडे घर रस्ता काँक्रिट करणे (५ लाख), १४) प्रभाग क्र. १२ मधील अनिल सावंत घर ते तात्या काटकर घर रस्ता काँक्रीट करणे (१० लाख), १५) प्रभाग क्रमांक १२ मधील माणिक काळे घर ते विठ्ठल मांजरे घर काँक्रीट रस्ता व बंदिस्त गटार (१३ लाख), १६) प्रभाग क्रमांक १२ मधील प्रमोद भोसले घर ते दादा वाघमारे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे (१० लाख), १७) प्रभाग क्रमांक ५ मधील मुस्लिम समाज मज्जिद येथे सभा मंडप दुरुस्ती करणे (१५ लाख), १८) प्रभाग क्रमांक ३ मधील गुंड वस्ती मध्ये अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ता करणे (१५ लाख), १९) प्रभाग क्रमांक १२ मधील मोती फराडे घर ते अल्ला मुलाणी घर भुयार गटार करणे (८ लाख), २०) प्रभाग क्रमांक १२ मधील अशोक कारंडे घर ते मोती फराडे घर भुयार गटार करणे (८ लाख), २१) प्रभाग क्रमांक १२ सुनील दीक्षित घर ते डॉक्टर देवडकर घर रस्ता काँक्रीट करणे (१० लाख), २२) प्रभाग क्रमांक १० मधील पठाण वस्ती ते मांढर फाटा रस्ता काँक्रिटीकरण करणे (१७ लाख), २३) प्रभाग क्रमांक १० मधील पावत का मंदिर येथे फेविंग ब्लॉक बसवणे (७ लाख), २४) प्रभाग क्रमांक १० मधील पावतका मंदिर ते यादव वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे (३० लाख), २५) प्रभाग क्रमांक १५ मधील खंडाळी रोड मिसाळ दुकान ते श्रीपुर बोरगाव रस्ता कॉक्रीट करणे (२० लाख), २६) प्रभाग क्रमांक १ मधील श्रीराम किराणा दुकान ते अमोल शिंदे घर रस्ता काँक्रिट करणे (१५ लाख), २८) प्रभाग क्रमांक १ मधील दादा धायगुडे घर ते आण्णा कचरे घर रस्ता कॉक्रीट करणे (१३ लाख), २८) प्रभाग क्रमांक १ मधील अजम तांबोळी ते सचिन लोंढे घर काँक्रीटीकरण करणे (१५ लाख), २९) प्रभाग क्रमांक ७ मधील विठ्ठल मंदिर ते रमेश गुजले घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे (१० लाख), ३०) प्रभाग क्रमांक १४ मधील ज्ञानेश्वर पाटील घर ते वाकसे घर काँक्रिटीकरण करणे (१५ लाख), ३१) प्रभाग क्रमांक १४ मधील सुजाता माने घर ते लक्ष्मण बिसनाळ घर भुयारी गटार व काँक्रीट रस्ता (१२ लाख), ३२) प्रभाग क्रमांक १४ मधील नंदकुमार महाजन ते कांताबाई जाधव भुयारी गटार व काँक्रीटीकरण रोड करणे (१५ लाख), ३३) प्रभाग क्रमांक १४ मधील भगवान लोहार घर ते सदाशिव गवळी घर ते सुरेखा जाधव घर भुयारी गटार काँक्रीट रस्ता (१९ लाख), ३४) प्रभाग क्रमांक १४ मधील स्मशानभूमी येथे सिमेंट पोल, एलईडी बल्ब, बोरवेल पंप बसविणे, पेविंग ब्लॉक बसवणे (१० लाख), ३५) प्रभाग क्रमांक ३ मधील रेडे वस्ती अंतर्गत काँक्रीट रस्ते व भुयारी गटार करणे (६० लाख), ३६) प्रभाग क्रमांक ३ मधील दिलीप भगत घर ते रमेश भगत घर व संजय भगत घर रस्ता काँक्रिटीकरण करणे (१९ लाख), ३७) प्रभाग क्रमांक ३ मधील कदम वस्ती ते भाटघर कॅनल ३४ फाटा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४० लाख), ३८) प्रभाग क्रमांक ३ मधील उजनी क्रमांक ३० फाटा ते सुभाष रेडेकर रस्ता कॉक्रिटीकरण, खडीकरण, डांबरीकरण करणे (२५ लाख), ३९) प्रभाग क्रमांक ३ मधील विलास जाधव घर ते मुंडफुणे वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे (३० लाख), ४०) प्रभाग क्रमांक १२ मधील जमदाडे प्लॉटिंग येथे अंतर्गत भुयारी गटार व काँक्रीट रस्ता करणे (७० लाख), ४१) प्रभाग क्रमांक १ मधील मेन रस्ता प्लॉटिंग ते केशव जाधव घर काँक्रीट रस्ता करणे (९ लाख), ४२) प्रभाग क्रमांक २ मधील भाटघर कॅनॉल ते नकुल शिंदे घर काँक्रीट रस्ता करणे (२५ लाख), ४३) प्रभाग क्रमांक ४७ मधील शिवाजीनगर येथील हनुमान मंदिर समोर काँक्रीट रस्ता व पेविंग ब्लॉक बसवणे (४ लाख), ४४) प्रभाग क्रमांक १७ मधील अंजना पवार ते दत्ता जगताप भुयारी गटार करणे (४ लाख), ४५) प्रभाग क्रमांक १७ मधील शिवाजीनगर येथील गणपती मंदिर समोर पेविंग ब्लॉक बसवणे (४ लाख), ४६) प्रभाग क्रमांक ३ मधील व्हरगर वस्ती ते महाळुंग मीरे ओढा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (४० लाख).
याप्रकारे माढा व महाळुंग- श्रीपुर नगरपंचायतींना एकुण पंधरा कोटी रुपये ची विकास कामे मंजूर झालेली आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Magnificent beat I would like to apprentice while you amend your site how can i subscribe for a blog web site The account helped me a acceptable deal I had been a little bit acquainted of this your broadcast offered bright clear idea
Blue Techker You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!
Blue Techker This was beautiful Admin. Thank you for your reflections.