ताज्या बातम्याराजकारण

माढा विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंह शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…..

मतदारसंघात मला कोणाचेही विशेष आव्हान नाही… माझाच विजय निश्चित…

माढा (बारामती झटका)

माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीतसिंह बबनराव शिंदे यांनी आज दि. 24 ऑक्टोबर रोजी माढा येथे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रियांका आंबेकर यांचेकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रणजीतसिंह शिंदे यांनी एक अपक्ष व दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत.

याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना रणजीतसिंह शिंदे म्हणाले की, मागील तीस वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय आमदार बबनदादा शिंदे यांनी मतदार संघात धवल क्रांती, हरितक्रांती, कृषी औद्योगिक क्रांती तसेच रस्ते, शिक्षण, वीज, पाणी सिंचन योजना याद्वारे अतिशय मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत. व माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी, कामगार, दलित मागासवर्गीय तसेच सर्वसामान्य नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

आणि यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. मी देखील त्यांचेच पावलावर पाऊल टाकून यशस्वीरित्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे व पुढे देखील निश्चितपणे करत राहणार आहे. हजारो लाखो युवकांसहित सर्व स्तरातील स्त्री पुरुष नागरिक मतदारांचा आम्हाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. या सर्व अनुकूल परिस्थितीचा विचार करता मला या निवडणुकीत कोणाचेही विशेष आव्हान नाही हे निश्चित असून मी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे, असा माझ्या सहित हजारो कार्यकर्त्यांना देखील पूर्ण विश्वास आहे.

पक्षाच्या तिकिटाविषयी बोलतांना रणजीतसिंह शिंदे म्हणाले की, खासदार पवार साहेब माढा लोकसभेचे खासदार प्रतिनिधी होते, त्यामुळे त्यांना माढा विधानसभा मतदारसंघातील सर्व परिस्थिती माहित आहे. आदरणीय बबनदादा यांचे व आमच्या शिंदे घराण्याचे मागील 38 वर्षांपासून पवार साहेब यांच्याशी प्रेमाचे आपुलकीचे व एकनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे ते नक्कीच पक्षाच्या वतीने मला तिकीट देण्यास सकारात्मक असणार आहेत, असा माझे सहित हजारो कार्यकर्त्यांना पूर्ण आत्मविश्वास आहे.

याप्रसंगी रणजीतसिंह शिंदे यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई बबनराव शिंदे तसेच त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्रणिता रणजीत शिंदे यांचे सह राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास तोडकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील, शंभूराजे मोरे, भारतआबा शिंदे, झुंजार भांगे तसेच प्रताप नलवडे, संदीप पाटील, राजू गोटे, अमोल चौरे, प्रमोद लोंढे, आजिनाथ देशमुख, सरपंच करकंब, नागेश उपासे, दिलीप पाटील, पांडुरंग पवार, अनिल वीर यांचे सह शेकडो कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button