माढा विधानसभेत निजामशाही, मोगलशाही, आदिलशाही विरुद्ध लोकशाही मार्गाने जनशक्तीच्या जोरावर “शिंदेशाही” असा सामना रंगणार..
सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष
माढा (बारामती झटका)
माढा विधानसभा निवडणूकीत निजामशाही, मोघलशाही, आदिलशाही विरुद्ध आजपर्यंत माढा विधानसभा मतदारसंघात केलेल्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा व विकासकार्याच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने जनशक्तीच्या जोरावर “शिंदेशाही” असा सामना रंगताना दिसत आहे. माढा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासामध्ये एका अपक्ष उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री, तीन खासदार, तीन मंत्री इतर पक्षाचे आजी-माजी आमदार, महाविकास आघाडीचे गाव व राज्य पातळीवरील नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन अपक्ष उमेदवार रणजीत बबनराव शिंदे यांच्या विरोधात प्रचार करीत असल्याने निजामशाही, मोगलशाही, आदिलशाही विरुद्ध लोकशाही मार्गाने जनशक्तीच्या जोरावर शिंदेशाही असा निवडणुकीत राजकीय सामना पहावयास मिळत आहे.
माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व स्वर्गीय आमदार विठ्ठलराव शिंदे यांनी केलेले होते. राजकारण 20% व समाजकारण 80% असा शिंदे घराण्याचा राजकीय वारसा आजपर्यंत पाणीदार षटकार आमदार बबनदादा शिंदे, उद्योजक रमेश मालक शिंदे, आमदार संजयमामा शिंदे या तीन बंधूंनी जपलेला आहे. त्यांचाच वारसा तिसऱ्या पिढीतील रणजीत शिंदे, विक्रमदादा, धनराज दादा, यशवंत शिंदे अशी युवक मंडळी पुढे चालवत आहेत. माढा तालुक्याच्या जडणघडणीत शिंदे परिवार यांचा सिंहाचा वाटा आहे. शिंदे परिवार यांनी राजकारण करीत असताना शरदचंद्रजी पवार व अजितदादा पवार यांच्या विचाराने आजपर्यंत सकारात्मक राजकारण केलेले आहे. माढा मतदारसंघात वाडीवस्ती, खेडोपाडी गावागावात मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, जलसिंचन योजना, पाणी यासाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करीत राहिलेले आहेत. शिंदे परिवार यांनी समाजामध्ये आपल्या कार्यातून व वर्तणुकीतून वेगळे नाते निर्माण केलेले आहे.
माढा तालुक्याचे भाग्यविधाते षटकार आमदार बबनदादा शिंदे यांनी तालुक्यामध्ये सकारात्मक राजकारण करून सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन गटातटाचे राजकारण न करता समाजाच्या हिताचे राजकारण आजपर्यंत केले आहे. त्यामुळेच त्यांना जनतेने सहा वेळा विधानसभेत जनतेची सेवा करण्याकरिता पाठविले होते. सध्या प्रकृती साथ देत नसल्याने तसेच जनतेची सेवा अविरतपणे राहावी यासाठी ज्यांनी जनसामान्य माणसांच्या हितासाठी काम केले ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन, साखर कारखान्याचे चेअरमन अशा अनेक विविध पदावर व संस्थांवर काम केलेले रणजीत बबनराव शिंदे यांना निवडणुकीत जनतेच्या आग्रहास्तव उभे केलेले आहे. पक्षाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून निवडणूक लढवायचे थांबलेले नाहीत, त्यांना अपक्ष उभा केलेले आहे. त्यांनी सुद्धा स्वतःची राजकीय कारकीर्द अपक्ष निवडणूक लढवून सुरू केलेली आहे.
तीस वर्षानंतर माढा तालुक्यातील जनतेने रणजीत शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुद्धा अपक्ष आमदार करूनच सुरुवात करावयाची हे, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेने ठरविले आहे. मात्र, गद्दारी ज्यांच्या घराण्यात व रक्तातच आहे अशा लोकांनी शिंदे परिवार यांचा वेगळा अपप्रचार करून निवडणुकीत मतदारांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा केविलवाणा प्रयोग सुरू आहे. मात्र, माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सुज्ञ जनता व जागरूक मतदार निश्चितपणे विरोधकांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.